Join us

'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:21 IST

सिनेमाच्या टीझरमधील अनेक सीन्समध्ये पाकिस्तान दिसत आहे. या सीन्सचं शूट नक्की कुठे झालं माहितीये का?

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'(Dhurandhar) सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर माधवन खतरनाक लूकमध्ये दिसत आहेत. रणवीर सिंहला पाहून तर त्याच्या खिलजी अवताराचीच आठवण येत आहे. या सिनेमाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाच्या टीझरमधील अनेक सीन्समध्ये पाकिस्तान दिसत आहे. या सीन्सचं शूट नक्की कुठे झालं माहितीये का?

'धुरंधर'च्या टीझरमध्ये रणवीर सिंह गुंडाच्या भूमिकेत दिसतोय. लांब केस, वाढलेली दाढी असा त्याचा लूक आहे. तो सतत मारहाण करताना आणि धूम्रपान करताना दिसतो. तसंच त्याचा दबदबाही पाहायला मिळतो. याशिवाय अर्जु रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्नाही व्हिलन अवतारात दिसत आहेत. टीझरमध्ये अनेक वेळा पाकिस्तानचे सीन्सही दिसतात. याचं शूट नेमकं कुठे झालं असेल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हे सीन्स थायलंडमध्ये शूट झाले आहेत. मेकर्सने थायलंडमधील लोकेशन्सला पाकिस्तानमध्ये रुपांतरित केलं. बँकॉकसह अन्य ठिकाणी हे शूट झालं आहे. यासाठी विशेष सेटही उभारण्यात आले होते. यासाठी थायलंड सरकारचंही त्यांना सहकार्य मिळालं.\

याआधीही बॉलिवूडच्या अनेक सिनेमांचं शूट थायलंडमध्ये झालं आहे. 'वॉन्टेड','रेडी','एक था टायगर' या सिनेमांचा समावेश आहे. नेटफ्लिक्स सीरिज 'द सर्पेंट' आणि 'मिस मार्वल' मधील पाकिस्तानचे सीन्ससाठी थायलंडमध्येच सेट उभारण्यात आले होते. 

'धुरंधर' सिनेमा यावर्षीच्या अखेरीस ५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाची कहाणी, कलाकारांचा अभिनय, एकापेक्षा एक स्टंट दृश्य पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

टॅग्स :रणवीर सिंगबॉलिवूड