Join us

रणवीर सिंगने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नॉन-फिक्शनमध्ये केलं पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 20:07 IST

रणवीरने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नॉन-फिक्शन शो करण्याचं ठरवलं आहे. त्याच्या शोची जबरदस्त सुरुवात झाली.

रणवीरने डिजिटल प्लॅटफॉर्मवर नॉन-फिक्शन शो करण्याचं ठरवलं आहे. त्याच्या शोची जबरदस्त सुरुवात झाली. तो म्हणतो, 'आयुष्यातील माझ्या बहुतेक निवडींमध्ये मी रिस्क घेतली आहे, कारण मला रिस्क घ्यायला  आवडते!'

सुपरस्टार रणवीर सिंग हा भारताच्या मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक आहे ज्याने काहीतरी वेगळे केले आहे. म्हणूनच, त्याने 'रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स' या नॉन-फिक्शन शोमध्ये काम करण्याचा निर्णय जाणून घेतल्याने प्रेक्षकांना आश्चर्य वाटले नाही आणि हा शो यशस्वी झाला. लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला! शोचे अगदी नवीन आणि अनोखे स्वरूप आणि उत्कृष्ट आशय तसेच बायरने उभ्या केलेल्या आव्हानांना तोंड देण्याचे रणवीरचे धाडस वाखाणण्यासारखे आहे!

रणवीरला आनंद झाला की रणवीर वर्सेस वाइल्ड विथ बेअर ग्रिल्सला त्याच्या रिलीजच्या अवघ्या एका दिवसात प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे! तो म्हणतो, “प्रामाणिकपणे सांगायचे तर लोकांना हे खूप आवडते कारण त्याची संकल्पना आणि स्वरूप वेगळे  आहे. मी नेहमी कंटेंटवर लक्ष देतो मग तो सिनेमा असू देत किंवा जाहिरात. पुढे तो म्हणाला, "वैयक्तिकरित्या मला ते खूप आवडले आणि खरे सांगायचे तर, ते ज्या प्रकारे सादर केले गेले आणि प्रेक्षकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी खूप आनंदी आहे. 

टॅग्स :रणवीर सिंग