सध्या बीटाऊनमध्ये अनेक विषयांवरुन वाद सुरु आहेत. दीपिका पादुकोणच्या विरोधात तर बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. आई झाल्यानंतर दीपिकाला 'स्पिरिट' आणि 'कल्की २' सिनेमांमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ८ तासांची शिफ्ट, मानधनात वाढ, प्रॉफिटमध्ये हिस्सा, सेटवर सोयीसुविधा अशा अनेक मागण्या केल्याने मेकर्स वैतागले आणि तिला सिनेमातून काढलं अशी चर्चा होती. दरम्यान बॉलिवूडमध्ये बड्या स्टार्सचे सेटवर नखरे असतात, व्हॅनिटी व्हॅन्सची मागणी करतात, त्यांच्या स्टाफसाठीही पगार मागतात अशी टीका होत आहे. त्यातच आता रणवीर सिंहच्या सेटवर ३ व्हॅनिटी असतात हे समोर आलं आहे. तसंच शाहरुख खानचाही कमी थाट नसतो.
'द हॉलिवूड रिपोर्टर इंडिया'च्या रिपोर्टनुसार, रणवीर सिंहच्या निकटवर्तियाने ही माहिती दिली आहे. रणवीर त्याच्या सिनेमाच्या सेटवर तीन व्हॅनिटी व्हॅन वापरतो. व्हॅनिटी वेंडर केतन रावल यांच्या हवाल्यानुसार, व्हॅनिटी व्हॅन ही सुरुवातीच्या काळात केवळ कामचलाऊ म्हणून वापरली जायची. म्हणजे आऊटडोअर शूटिंग वेळी कलाकारांना कपडे बदलता यावे आणि इतर सोयीसाठी अडचण नको म्हणून ती असायची. तर आता व्हॅनिटी व्हॅन ही आलिशान लाईफस्टाईलचा भाग बनली आहे."
केतन पुढे सांगतात, "शाहरुख खानची व्हॅनिटी व्हॅन तर इतकी मोठी आहे की ती काही रिमोट एरियांमध्ये जाऊही शकत नाही. जेव्हा शाहरुखला दूर अडचणींच्या ठिकाणी शूटला जायचं असतं तेव्हा मी त्याला स्वत:ची व्हॅनिटी पाठवतो. तर दुसरीकडे जॉन अब्राहमच्या व्हॅनिटीमध्ये ब्लॅक टॉयलेट आहे. तसंच जमिनीपासून ते सीलिंगपर्यंत त्याच्या व्हॅन मध्ये खिडक्या लावल्या आहेत. मात्र आतला संपूर्ण एरिया काळा आहे. जमीन, भिंती, सिंक सगळं काळं आहे. या सर्व व्हॅन्सच्या मेंटेन्सचा खर्च १० ते १५ लाख रुपये आहे. तर यांची किंमत २ ते ३ कोटी रुपये आहे."