Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: VFX चा वापर न करता 'धुरंधर २'मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक 'असा' तयार झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:29 IST

सिनेमातील रणवीरचा एका सीनदरम्यान असलेल्या भूताचा लूक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर २' (Dhurandhar 2) सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रम प्रस्थापित करत आहे. चित्रपटाच्या तगड्या कमाईसोबतच आता अभिनेता रणवीर सिंग याच्या 'घोस्ट बॉर्न ऑफ शॅडोज' या भयानक लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हा लूक इतका रिअल आहे की तो पाहून प्रेक्षक सुद्धा थक्क झाले होते. नुकतंच या लूकच्या 'ट्रान्सफॉर्मेशन'चा एक पडद्यामागील (BTS) व्हिडीओ समोर आला असून तो पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रसिद्ध सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट प्रीतिशील सिंगनं इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आतापर्यंत अनेक प्रेक्षकांना असे वाटत होते की, रणवीरचा हा भयानक लूक ग्राफिक्स (VFX) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करून साकारला आहे. मात्र, तसे नाही. हा लूक पूर्णपणे 'प्रोस्थेटिक मेकअप'चा चमत्कार असल्याचे समोर आले आहे.

व्हिडीओ शेअर करत प्रीतिशील सिंगनं कॅप्शनमध्ये लिहलं की, ""जेव्हा तुझे मन थकते, तेव्हा भ्रम आपल्या असत्यांना अशा रंगांनी रंगवतो, ज्यांवर विश्वास ठेवण्यासाठी आपण आतुर होतो! छायांमधून जन्मलेल्या भुतात रणवीर सिंगचा हा अवतार! ‘धुरंधर: द रिव्हेंज".

काय आहे या व्हिडीओमध्ये?शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रणवीर सिंग अत्यंत शांतपणे खुर्चीवर बसलेला दिसत आहे, तर मेकअप आर्टिस्टची एक मोठी टीम त्याच्या चेहऱ्यावर रंगकाम करून आणि एकावर एक थर लावून त्याचे रूप बदलत आहे. त्याचे ते गूढ आणि थरकाप उडवणारे रूप साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने लिहिले, "मला खरंच वाटलं होतं की हे सगळं ग्राफिक्स आहे, पण हे अफलातून आहे". तर दुसऱ्याने रणवीरच्या संयमाचे कौतुक केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranveer Singh's 'Dhurandhar 2' look achieved without VFX: Here's how.

Web Summary : Ranveer Singh's terrifying 'Ghost Born of Shadows' look in 'Dhurandhar 2' was created using prosthetic makeup, not VFX or AI. A behind-the-scenes video reveals the transformation, stunning viewers with the artistry involved. Makeup artist Preetisheel Singh shared the video, praising the illusion.
टॅग्स :रणवीर सिंगधुरंधर सिनेमा