Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर सिंगचा 'धुरंधर- पार्ट २' सिनेमा १९ मार्चला रिलीज होणार नाही? दिग्दर्शक आदित्य धरने मौन सोडलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 16:51 IST

रणवीर सिंगचा बहुचर्चित धुरंधर पार्ट २ ठरलेल्या तारखेला अर्थात १९ मार्च २०२६ ला रिलीज होणार नाही, अशी चर्चा आहे. यावर आदित्य धरने मौन सोडलंय.

बॉलिवूडचा 'एनर्जी किंग' रणवीर सिंग आणि दिग्दर्शक आदित्य धर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर प्रेक्षकांमध्ये त्याच्या दुसऱ्या भागाची, म्हणजेच 'धुरंधर २'ची मोठी उत्सुकता आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ही फिल्म पुढे ढकलली  जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या अफवांवर दिग्दर्शक आदित्य धरने स्वतः स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहेत अफवा?

'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार ही घोषणा खूप आधीच करण्यात आली होती. मात्र, नेमक्या याच तारखेला साऊथ सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक' (Toxic) देखील प्रदर्शित होणार आहे. दोन मोठ्या सुपरस्टार्सचे चित्रपट एकाच दिवशी येणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा होणार हे स्पष्ट आहे. हीच टक्कर टाळण्यासाठी रणवीर सिंगचा 'धुरंधर २' चित्रपट पुढे ढकलला जाणार, अशा बातम्या सोशल मीडियावर पसरू लागल्या होत्या.

या सर्व चर्चांना पूर्णविराम देत दिग्दर्शक आदित्य धरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याने चाहत्यांच्या काही पोस्ट्स रि-शेअर केल्या, ज्यामध्ये चाहत्यांनी चित्रपटाबद्दलची आपली उत्सुकता व्यक्त केली होती. एका चाहत्याला उत्तर देताना आदित्यने स्पष्टपणे लिहिले, "खूप प्रेम! धन्यवाद, १९ मार्च रोजी चित्रपटगृहात भेटूया." आदित्य धरच्या या विधानामुळे हे स्पष्ट झाले आहे की, 'धुरंधर २' त्याच्या ठरलेल्या वेळेनुसारच प्रदर्शित होणार असून चित्रपट पुढे ढकलण्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत.

बॉक्स ऑफिसवर महासंग्राम 

आगामी १९ मार्च २०२६ रोजी भारतीय चित्रपटसृष्टीत दोन मोठे चित्रपट आमनेसामने येणार आहेत. एका बाजूला रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त आणि आर. माधवन अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'धुरंधर २' असेल, तर दुसऱ्या बाजूला 'केजीएफ' फेम यशचा 'टॉक्सिक' असेल. या क्लॅशमुळे प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. दरम्यान, याच तारखेला प्रदर्शित होणारा अजय देवगणचा 'धमाल ४' हा चित्रपट मात्र मे २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Dhurandhar 2' release date: Director clarifies rumors amid 'Toxic' clash.

Web Summary : Director Aditya Dhar refutes rumors of postponing 'Dhurandhar 2' due to Yash's 'Toxic' release. The film remains slated for March 19, 2026, promising a box office clash.
टॅग्स :धुरंधर सिनेमारणवीर सिंगअक्षय खन्नासंजय दत्तअर्जुन रामपाल