सुपरस्टार रणवीर सिंहचा स्पाय थ्रिलर 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. सलग २५ दिवस या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम राखला आहे. लवकरच हा चित्रपट १७०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
'सॅकनिल्क'च्या आकडेवारीनुसार, 'धुरंधर २' ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०२ कोटींची दणदणीत कमाई केली होती. आता २५ व्या दिवशी, म्हणजेच चौथ्या रविवारी, चित्रपटाने १४.८७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. यासह भारतातील एकूण निव्वळ कमाई आता १०८३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतातील एकूण कमाईचा आकडा १२९७ कोटींवर गेला आहे.
जागतिक स्तरावर 'धुरंधर' कामगिरीजगभरातील कमाईचा विचार करता, या स्पाय थ्रिलरने आतापर्यंत १,६९१ कोटी कमावले आहेत. हा चित्रपट आता जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ भारतीय चित्रपटांच्या यादीत मानाने विराजमान झाला आहे. लवकरच 'धुरंधर २' 'पुष्पा २' आणि 'बाहुबली २' ला टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
चित्रपटाची स्टारकास्ट आणि दिग्दर्शन
आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा स्पाय ॲक्शन-थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि मानव गोहिल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जिओ स्टुडिओज आणि बी६२ स्टुडिओजने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे.
जगभरातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप ५ भारतीय चित्रपट
दंगल: २,००० कोटीबाहुबली २: १,८०० कोटीपुष्पा २: १,७४२ ते १८७१ कोटीधुरंधर २: १,६९१ कोटीआरआरआर: १,३८७ कोटी
Web Summary : Ranveer Singh's 'Dhurandhar: The Revenge' dominates the box office, earning ₹1691 crore globally in 25 days. It is now among the top 5 highest-grossing Indian films, poised to challenge 'Pushpa 2' and 'Baahubali 2'.
Web Summary : रणवीर सिंह की 'धुरंधर: द रिवेंज' बॉक्स ऑफिस पर छाई हुई है, जिसने 25 दिनों में विश्व स्तर पर ₹1691 करोड़ कमाए। अब यह शीर्ष 5 सबसे ज्यादा कमाई करने वाली भारतीय फिल्मों में शामिल है, जो 'पुष्पा 2' और 'बाहुबली 2' को टक्कर देने के लिए तैयार है।