Join us

 रणवीरने अभिमन्यू को क्यों मारा? पाहा, भाग्यश्रीच्या लेकाचा खास व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:34 IST

अभिमन्यूच्या पदार्पणाच्या बातम्या चर्चेत असताना तूर्तास त्याचा आणि रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूम करतोय.

ठळक मुद्देभाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने याआधी दम मारो दम आणि नौटंकी साल  या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील सौज्वळ चेह-याची भाग्यश्री बॉलिवूडमधून गायब आहे. पण भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून अभिमन्यूचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होतेय. अभिमन्यूच्या पदार्पणाच्या बातम्या चर्चेत असताना तूर्तास त्याचा आणि रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धूम करतोय. या व्हिडीओतील खास बात म्हणजे, या व्हिडीओत रणवीर अभिमन्यूला जोरदार ‘मुक्का’ मारताना दिसतो. अभिमन्यूने स्वत: हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘सिम्बा सूर्याला भेटला...दर्द नहीं होता बाकी सब होता है...तू मेरा भाई है,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना अभिमन्यूने लिहिले आहे.  काही तासांत हजारो लोकांनी रणवीर व अभिमन्यूचा हा व्हिडीओ पाहिला. आमचे मानाल तर, हा व्हिडीओ तुम्हीही पाहा आणि तो पाहिल्यानंतर ‘रणवीरने अभिमन्यू को क्यों मारा?’ असा प्रश्न पडलाच तर हा सगळा प्रमोशन फंडा असल्याचे लक्षात घ्या.

मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात अभिनेत्री राधिका मदन अभिमन्यूच्या अपोझिट दिसणार आहे. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीची भरमार असलेला हा चित्रपट अनुराग कश्यपची निर्मिती आहे.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने याआधी दम मारो दम आणि नौटंकी साल  या चित्रपटात अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तूर्तास अभिमन्यू त्याच्या डेब्यूसाठी प्रचंड उत्सूक आहे. सोबतच त्याच्यावर दबावही आहे. स्टारकिड्स असल्याने काहीही फायदा होत नाही. उलट याने तुमच्यावर अधिक प्रेशर निर्माण होते, असे त्याचे मत आहे. आता हे प्रेशर अभिमन्यू कसे आणि किती पेलतो, हे लवकरच कळेल. 

टॅग्स :रणवीर सिंगभाग्यश्री