Ranveer Singh Mimicking Shreya Ghoshal : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला 'धुरंधर : द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्डस् मोडले आहेत. चित्रपटातील रणवीरचा दमदार अभिनय पाहून जवळपास प्रत्येक प्रेक्षक पूर्णपणे भारावून गेल्याचे दिसून येत आहे. सध्या प्रत्येक जण त्याचे कौतुक करताना दिसून येत आहे. अशातच आता रणवीरचा गोड क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये गायिका श्रेया घोषाल हिचे गाणे गाताना दिसतोय.
मुंबईतल्या नीता मुकेश अंबानी कलात्मक केंद्राच्या (NMACC) तिसऱ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात श्रेया घोषालनं इतर पाहुण्यांशी बोलताना रणवीरचं कौतुक केलं. ती म्हणाली, "तो प्रत्येक गाणं हृदयातून जाणून घेतो आणि त्याच्यावर नाचतो, प्रत्येक स्टेप त्याला माहीत आहे". यानंतर रणवीर श्रेया घोषालने गायलेलं 'गजनी' चित्रपटातील 'लट्टू' हे गाणं गात श्रेयाची मजेशीर नक्कल करताना दिसला. जे पाहून श्रेयाला हसू आवरले नाही. रणवीर आणि श्रेयाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
'धुरंधर'चा बॉक्स ऑफिसवर महाधडाकारणवीरच्या अभिनयाने सजलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट आहे. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलरने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. जगभरात या सिनेमानं १६०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात रणवीरशिवाय, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Web Summary : Ranveer Singh mimicked Shreya Ghoshal's song 'Lattu' at an event, drawing laughter. Ghoshal praised Singh's passion for music and dance. His film 'Dhurandhar: The Revenge' is a box office success, grossing ₹1600 crore worldwide.
Web Summary : रणवीर सिंह ने एक कार्यक्रम में श्रेया घोषाल के गाने 'लट्टू' की मिमिक्री की, जिससे हंसी फैल गई। घोषाल ने सिंह के संगीत और नृत्य के प्रति जुनून की सराहना की। उनकी फिल्म 'धुरंधर: द रिवेंज' बॉक्स ऑफिस पर सफल रही, जिसने दुनिया भर में ₹1600 करोड़ की कमाई की।