Join us

विचित्र लूकमध्ये दिसला रणवीर सिंग, युजर्स म्हणाले - भावा नेक्स्ट टाइम नक्की पटियाला घाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 18:10 IST

रणवीर सिंग लवकरच '८३' चित्रपटात दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी ओळखला जातो. तो नेहमी वेगवेगळ्या कॉश्च्युममध्ये पहायला मिळतो. त्यामुळे बऱ्याचदा त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. रणवीरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो वेगळ्याच लूकमध्ये दिसतो आहे. त्याच्या या फोटोवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत.

रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत त्याने ब्राऊन रंगाच्या शूजसोबत काळ्या व गोल्डन रंगाचे कॉम्बिनेशन असणारा प्रिटेंड पॅण्ट परिधान केली आहे. यासोबत मस्टर्ड रंगाचा शर्ट घातला आहे. रणवीरच्या गळ्यात पेंडेंट परिधान केले आहे. त्यासोबत ऑरेंज रंगाचा चश्मा त्याने परीधान केला आहे.

सोशल मीडियावर रणवीर सिंगचा हा लूक व्हायरल होत आहे. कुणी त्याच्या स्वॅगचं कौतूक करतं तर कुणी कमेंट केली की, भावा नेक्स्ट टाइम पटियाला नक्की घाल.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर रणवीर लवकरच ८३ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण कपिल देवच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

याव्यतिरिक्त रणवीर लवकरच एका गुजराती व्यक्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच त्याचा जयेशभाई जोरवाला चित्रपटातील लूक समोर आला होता.

टॅग्स :रणवीर सिंग८३ सिनेमा