Join us

का आला रणवीरला ‘सदमा’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 09:18 IST

रणवीर सिंग आणि करीना कपूर खान हे दोघे ‘सदमा’च्या आॅफिशियल रिमेकमध्ये काम करणार आहेत हे ठरलेले होते. त्यानिमित्ताने बेबो-आरव्हीची ...

रणवीर सिंग आणि करीना कपूर खान हे दोघे ‘सदमा’च्या आॅफिशियल रिमेकमध्ये काम करणार आहेत हे ठरलेले होते. त्यानिमित्ताने बेबो-आरव्हीची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहावयास मिळणार होती.पण, बेबो जास्त काळ या प्रोजेक्टचा भाग नसणार आहे. ती म्हणते,‘ मी जास्त दिवस या प्रोजेक्टचा भाग नसेल. मी हा चित्रपट करत नाहीये. तिने जेव्हा निर्मात्यांना सांगितले की, ती हा चित्रपट करू इच्छित नाही तेव्हा त्यांनी सध्या हा चित्रपट होल्डवर ठेवला आहे.अद्याप त्याची शूटिंग सुरू झालेली नाही. एका मुलाखतीदरम्यान, रणवीरला विचारण्यात आले की, या भूमिकेसाठी त्याला टक्कल करावे लागणार आहे तेव्हा तो म्हणाला,‘ ये सुन के मुझे सदमा आगया.’ रणवीर ज्या प्रश्नांचे उत्तर देतो ते अत्यंत फनी आणि त्याच्या स्टाईलमध्ये असतात.