Join us

रणवीर मिरवतोय त्याचा ‘बेफिक्रे’ लुक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 10:16 IST

 वेल, रणवीर सिंग हा त्याला चित्रपटासाठी मिळालेल्या लुकचा नेहमीच आनंद लुटत असतो. कुठल्याही इव्हेंटसाठी तो त्याचा लुक मग बदलत ...

 वेल, रणवीर सिंग हा त्याला चित्रपटासाठी मिळालेल्या लुकचा नेहमीच आनंद लुटत असतो. कुठल्याही इव्हेंटसाठी तो त्याचा लुक मग बदलत नाही. बाजीराव मस्तानी चित्रपटासाठी त्याने दाढी-मिशांसहित जो लुक केला होता. तो त्याने अक्षरश: एन्जॉय केला होता.आता तो  पॅरीसमध्ये ‘बेफिक्रे’ चित्रपटाची शूटिंग करत असून सध्या तो त्याचा लुक मिरवतो आहे. त्याच्या फॅन्ससोबत फोटो काढणे, सेल्फी काढणे हे त्याला प्रचंड आवडते. आता त्याचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला आहे.तो म्हणजे तो मार्चे डॉफिन्स यांच्या म्युजिक सेक्शनमध्ये. तो सध्या खुप चांगल्या मुडमध्ये आहे हे फोटोवरून कळूच शकते ना. बेफिक्रे हा चित्रपट एक रोमँटिक चित्रपट असून आदित्य चोप्रा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुन्हा उतरलाय. यात रणवीरसोबत वाणी कपूरही दिसणार आहे.