Join us

बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रणवीरने केले रॅप; म्हणाला ‘अपना टाइम आएगा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:35 IST

रणवीरने नुकतेच एका बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रॅप प्रेझेंट करून असा काही धुमाकूळ घातला की, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘अपना टाइम आएगा’ म्हणत त्याने सर्वांची मने जिंकून घेतली.

 रणवीर सिंग एखाद्या इव्हेंटमध्ये गेला आणि तिथे काहीतरी हटके त्याने केले नाही, असे कधी होईल का? नाही ना. रणवीर सिंग कायम त्याच्या अतरंगी अंदाजासाठी ओळखला जातो. रणवीरने नुकतेच एका बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीत रॅप प्रेझेंट करून असा काही धुमाकूळ घातला की, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘अपना टाइम आएगा’ म्हणत त्याने सर्वांची मने जिंकून घेतली. 

 त्याचं झालं असं की, अलीकडेच रणवीर सिंग बँगलोरमध्ये एका बेस्ट फ्रेंडच्या प्री-वेडिंग सेरेमनीसाठी पत्नी दीपिकासोबत गेला. वेगवेगळे इव्हेंट सुरू असताना एका इव्हेंटदरम्यान त्याने स्टेजवर चढून गली बॉय चित्रपटातील ‘अपना टाइम आएगा’ हे रॅप सादर करत सर्वांची मने जिंकली. या इव्हेंटवेळी रणवीर गोल्डन कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत होता. त्याने स्टेजवर चढून हे रॅप सादर केले आणि उपस्थितांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण हे कायम त्यांच्या चाहत्यांना वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओजच्या माध्यमातून भेटीला येत असतात. त्यांच्यातील बाँण्डिंग ही ते चाहत्यांना दाखवत असतात. आता हे कपल ‘८३’ या आगामी हिंदी चित्रपटात दिसणार आहे. दीपिका ही रणवीरच्या पत्नी रोमीच्या भूमिकेत या चित्रपटात दिसणार आहे. रणवीर या चित्रपटात माजी क्रिकेटर कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.     

टॅग्स :रणवीर सिंगदीपिका पादुकोणबेंगळूर