Join us

​रणवीर-दीपिकाचा कार शोरूममध्ये रोमांस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 09:48 IST

रणवीर सिह आणि दीपिका पादुकोण एका कार शोरूममध्ये किस करताना क ॅमेºयात कैद झाले आहेत. या दोघांत नक्की काय ...

रणवीर सिह आणि दीपिका पादुकोण एका कार शोरूममध्ये किस करताना क ॅमेºयात कैद झाले आहेत. या दोघांत नक्की काय सुरू आहे याचा विचार करण्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ज्या कार शोरूममध्ये ते रोमांस करताना दिसले ते ठिकाण दीपिकाच्या घरापासून अगदी जवळ आहे हे विशेष.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या गाडी खरेदीचा बेत आखून कोणती कार विकत घ्यावी हे ठरविण्यासाठी दोघेही कार शोरूममध्ये आले होते. यावेळी दोघांत काही विशेष काही असावे असे येथे असलेल्या लोकांना वाटले नाही. मात्र काही वेळातच त्यांनी एक मेकांच्या हातात हात घातले. आपल्याला कुणीच पाहत नाही असे दिसताच त्यांनी एकमेकांना किस केले. यावेळी त्यांनी आपल्या आसपास लोक आहेत याचीही चिंता त्यांना नव्हती. त्याच्या या किस सिनमुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी देखील जेव्हाही दोघेही एकत्र आले तेव्हा रणवीर तिची चांगलीच काळजी घेताना दिसला होता. एका पार्टीत तर रणवीरने दीपिकाला वाट काढून देण्यासाठी चांगलाच घाम गाळला होता. यामुळे दोघांत काहीतरी विशेष आहे हे नक्क ी. रणवीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘आता मला बाप होण्याची इच्छा होत आहे’ असे सांगितले होते. यामुळे या दोघांत फुलत जाणारे प्रेम बरेच काही सांगून जाते. रणवीरला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात दीपिकाचा मोठा वाटा मानला जातो. तिच्यासोबतचे दोन चित्रपट रणवीरच्या करिअरला कलाटणी देणारे ठरले आहेत. रणवीर दीपिका संजय लीला भन्साळीच्या आगामी पद्मावती या चित्रपटात दिसणार आहे. मात्र दोघेही एकमेकांच्या अपोझिट नाहीत. दीपिकादेखील आपल्या करिअरच्या पिक पार्इंटवर असून तिची प्रमुख भूमिका असलेला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झेंडर केज’ लवकरच प्रदर्शित होणार असून यात ती विन डिझेलच्या अपोझिट दिसेल. रणवीर सिह आदित्य चोपडाच्या आगामी ‘बेफि के्र’ या चित्रपटात वाणी कपूरच्या अपोझिट पहायला मिळेल.