Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणवीर-आलियाला करायचेय एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 14:24 IST

 रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी चित्रपटात एकत्र काम केलेल नाही. मात्र ते एकमेकांसोबत एकदम क्यूट कपल दिसतात हे ...

 रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी चित्रपटात एकत्र काम केलेल नाही. मात्र ते एकमेकांसोबत एकदम क्यूट कपल दिसतात हे आपण मान्य केले आहे. ते आता लवकरच एकमेकांसोबत चित्रपटात दिसणार असल्याचे कळते आहे.रणवीर सध्या आदित्य चोप्रा यांच्या ‘बेफिक्रे’ चित्रपटामध्ये वाणी कपूरसोबत काम करत आहे. पॅरिसमध्ये दोघेही चित्रपटाची शूटींग करत आहे. तसेच आलिया देखील ‘उडता पंजाब’ च्या प्रमोशनमध्ये आत्तापर्यंत होती.‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाचीही ती शूटींग करते आहे. लवकरच ते एखाद्या चित्रपटात एकत्र दिसतील यात काही शंका नाही.