Join us
Daily Top 2Weekly Top 5

रानू मंडलचं 'तेरी मेरी कहानी' गाणं झालं रिलीज, हिमेश रेशमियानं दिला बॉलिवूडमध्ये ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 17:38 IST

सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेली रानू मंडलचं पहिलं गाणं 'तेरी मेरी कहानी' आलं प्रेक्षकांच्या भेटीला

सोशल मीडियावर सध्या एका गायिकेची जोरदार चर्चा आहे ती म्हणजे रानू मंडल. तिचं पहिलं गाणं 'तेरी मेरी कहानी' प्रदर्शित झालं आहे. हे गाणं तिने हिमेश रेशमिया सोबत गायलं आहे. हे गाणं हिमेश रेशमियाचा आगामी चित्रपट हॅप्पी हार्डी अँड हीरमधील गाणं आहे.

रानू मंडल आणि हिमेश रेशमिया या गाण्यात चित्रपटातील सीन व्यतिरिक्त रानू मंडल देखील दिसत आहे. या चित्रपटात हिमेश रेशमिया दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. 

रानू मंडलच्या सुरेल आवाजातलं 'एक प्यार का नगमा' असं काही सुपरहिट झालं की प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. कधी काळी ती रानाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात भीक मागत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या रानू मंडल यांना हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनल्या. 

रानू पश्चिम बंगालच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गात स्वत:च पोट भरत असे. अनेक जण तिच्या मधूर आवाजाने मंत्रमुग्ध होत.

काहीजण तिचे कौतुक करत तर काही जण तिच्या हातात चार-दोन रूपये टिकवून पुढे चालते होत. पण एतींद्र चक्रवर्तीने एक दिवस रस्त्यावर गाणाºया रानूला गाताना बघितले आणि तिचा गातानाचा व्हिडीओ घेतला.

रानू लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा’ हे गीत गात होती. एतींद्रने तिचा व्हिडीओ बनवला आणि आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. तो इतका व्हायरल झाला की, या व्हिडीओने रानूचे आयुष्य बदलले.

टॅग्स :हिमेश रेशमियाराणू मंडल