Join us  

बाबो उद्धटपणा भोवला की काय?, एका रात्रीत लोकप्रिय झालेली रानू मंडल आता जुन्याच घरी जगतेय असे जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 3:04 PM

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती.

रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसै मिळवून उदरनिर्वाह करणारी रानू मंडल रातोरात स्टार झाली. तिच्या प्लॅटफॉर्मवरील गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जसा व्हायरल झाला तसे तिचे आयुष्य बदलले. पण हे चांगले दिवस कायमचे राहिले नाहीत. आता काही दिवसांतच रानूवर पुन्हा स्टेशनवर गाण्याची वेळ आली आहे. ती सध्या तिच्या जुन्या घरीच राहत असल्याची माहिती आहे.अचानक प्रसिद्धीझोतात आलेली रानू मंडल बऱ्याच दिवसापासून गायब आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळं रानू एका रात्रीत सेलिब्रिटी झाली होती. तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर तिला बॉलिवडू चित्रपटात गाणं गायची संधी देखील मिळाली. पण वाट्याला आलेलं हे स्टारडम रानूला टिकवता आले नाही. तिची लोकप्रियता इतकी होती की, तिला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमा होत होती पण तिला हे सर्व हाताळता आले नाही. चाहत्यांसोबत गैरवर्तन, मीडियाच्या प्रतिनिधांना उलट उत्तरं देणं यासर्वामुळं तिचे जूने दिवस परत आले आहेत अशी चर्चा आहे.

 काही दिवसांनंतर समजलं की रानू मंडल पुन्हा पश्चिम बंगाल येथील तिच्या जुन्या घरीच राहत आहे.   मीडिया रिपोर्टनुसार, सध्या रानू मंडलच्या घरी अनेक मोठमोठ्या लेखकांचे येणेजाणे वाढले आहे आणि राणू मंडल ही या लेखकांना आपल्या जुन्याच घरी बसून त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टींबद्दल सांगत आहे. कारण लवकरच रानू मंडलच्या जीवनावर सिनेमा बनणार आहे. ती या लेखकांना हेच समजवण्यासाठी जुन्या घरी राहत आहे की येथे राहताना तिने किती अडचणींना तोंड दिले आहे. या सर्व माहितीच्या आधारावरच हे सर्व लेखक प्रयत्न करत आहेत की रानू मंडलच्या जीवनाची संघर्ष कहानी लोकांपर्यंत पोहचवावी. अर्थात या बदल्यात रानू मंडलला याचा मोबदला म्हणून खूप पैसे मिळणार आहेत.

टॅग्स :राणू मंडलहिमेश रेशमिया