Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबब! राणीच्या टी-शर्टची आणि पायजम्याची किंमत वाचून पळेल तुमच्या तोंडचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 14:22 IST

राणी मुखर्जी तिने घातलेल्या टी-शर्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राणीचा व्हाईट-टी शर्टमधील फोटो व्हायरल होतोय

ठळक मुद्दे या कपड्यांमध्ये राणी एअरपोर्टवर स्पॉट झाली होती

राणी मुखर्जी तिने घातलेल्या टी-शर्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. राणीचा व्हाईट-टी शर्टमधील फोटो व्हायरल होतोय त्याला कारणा ही तसेच आहे इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार राणीने घातलेल्या टी-शर्टची किंमत 45 हजार आहे तर पायजम्याची किंमत 1 लाख रुपये आहे. या कपड्यांमध्ये राणी एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. राणीने  GUCCI चा टी-शर्ट, पायजमा आणि शूज घातले होते. यासगळ्याची ऐकूण किंमत होती जवळपास 4 लाख रुपये. या पूर्ण गेटअपमध्ये राणी सिंपल आणि सोबर दिसत होती. 

राणी मुखर्जीच्या वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, सध्या  ‘मर्दानी 2’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘मर्दानी 2’चे सुमारे ९० टक्के शूटींग राजस्थानात पार पडले आहे.  ‘मर्दानी 2’ या चित्रपटात राणी पुन्हा एकदा एक निर्भय व कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मर्दानी’च्या प्रीक्वेलमधील राणीची भूमिका सुपरहिट ठरली होती आणि तिचे बरेच कौतुक झाले होते.

त्या सिनेमात राणीने बाल तस्करीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे सिक्वेलमध्ये राणीच्या विरुद्ध कोण खलनायक साकारणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी राणीच्या ‘हिचकी’ने जगभर धुमाकूळ घातला होता. आता लवकरच आदित्य चोप्रा निर्मित या सिनेमात राणीचे दर्शन घडेल.  ‘मर्दानी’चा लेखक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ च्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.  

टॅग्स :राणी मुखर्जी