अभिनेत्री राणी मुखर्जीला १० वर्षांची आदिरा ही मुलगी आहे. पती आदित्य चोप्राशी लग्नानंतर राणीने काही वर्षातच लेकीला जन्म दिला होता. मात्र छोट्या आदिराचा चेहरा जगासमोर आलेला नाही. राणीने सुरुवातीपासूनच तिचे फोटो काढायला पापाराझींना बंदी केली होती. तसंच राणी स्वत:ही सोशल मीडियावर नाही त्यामुळे तिथेही आदिराचे फोटो आले नाहीत. आता नुकतंच राणीने लेकीचा उल्लेख करत आपण तिला घाबरत असल्याचं वक्तव्य केलं. असं का म्हणाली राणी?'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत राणी मुखर्जी म्हणाली,"वडिलांच्या निधनानंतर आता माझ्या अभिनयावर त्यांच्या फिडबॅक मिळणार नाही याची कमी मला जाणवते. हे खूप कठीण आहे पण देव सगळं बघत असतो. त्याने माझ्या आयु्ष्यात आदिराला आणलं. ती माझ्या खूप जवळ आहे. तिला माझा अभिमानही वाटतो. माझ्या लेकीनेच माझ्या वडिलांचा जागा घेतली आहे. ती माझी सर्वात मोठी चिअरलीडर आहे. तिने माझे काही सिनेमे पाहिले. ती मला रडताना पाहू शकत नाही. म्हणून मला स्क्रीनवर पाहणं तिला जरा कठीण वाटतं. पण जेव्हा मी डान्स करते, आनंदी असते तेव्हा हे सगळं स्क्रीनवर पाहायला तिला जाम आवडलं. तिला 'हिचकी','थोडा प्यार थोडा मॅजिक','बंटी और बबली' हे सिनेमे आवडतात. पण काही सिनेमा पाहायला तिला जड जातं. जसं की एखाद्या सिनेमात मी पहिल्याच सीनमध्ये मेलेली असते हे ती पाहू शकत नाही."
ती पुढे म्हणाली, "तिला मी मेकअप केलेला आवडत नाही. मी मेकअपमध्ये समोर आले तर ती मला म्हणते,'तुम मेरी मम्मा जैसी नही लग रही हो'. मी मेकअप काढल्यावरच ती माझ्याजवळ येते. ती मला अनेकदा ओरडते. ती जेन अफ्ला आहे. ती माझ्यावर भडकते आणि मला तिचं ऐकून घ्यावंच लागतं. कारण पिढी बदलली आहे. जसं की मी आईचे धपाटे खाल्ले आहेत. पण आज मी हे माझ्या मुलीसोबत करु शकत नाही. उलट तीच मला मारेल. नॅशनल अवॉर्ड वेळी ती घरभर नाचत होती. हे खूप प्रेमळ आहे पण ती अल्फा आहे. म्हणून मला तिची भीतीच वाटते."
Web Summary : Rani Mukerji reveals she's 'scared' of her 10-year-old daughter, Adira, who critiques her movie roles and dislikes her makeup. Adira is Rani's biggest cheerleader but also a strong personality who isn't afraid to express her opinions, making Rani feel slightly intimidated.
Web Summary : रानी मुखर्जी ने खुलासा किया कि उन्हें अपनी 10 साल की बेटी आदिरा से 'डर' लगता है, जो उनकी फिल्मों की आलोचना करती है और उन्हें मेकअप पसंद नहीं है। आदिरा, रानी की सबसे बड़ी चीयरलीडर है, लेकिन एक मजबूत व्यक्तित्व भी है, जो अपनी राय व्यक्त करने से नहीं डरती, जिससे रानी थोड़ी डरी हुई महसूस करती हैं।