संगीतकार ए आर रहमान सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत धार्मिक भेदभाव होतो असं त्याने वक्तव्य केलं होतं. या कारणामुळे ८ वर्षांपासून इंडस्ट्रीत काम मिळालं नाही असंही तो म्हणाला. यावरुन इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत रहमानवर पलटवार केला. आता अभिनेत्री राणी मुखर्जीनेही ए आर रहमानच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली आहे. नक्की काय म्हणाली राणी?
डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राणी मुखर्जी म्हणाली,"बॉलिवूड ही सर्वात धर्मनिरपेक्ष जागा आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. इथे जात-धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव होत नाही. माझ्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत मला आजपर्यंत असा अनुभव आला नाही. माझं या इंडस्ट्रीवर खूप प्रेम आहे. याच इंडस्ट्रीने मला घडवलं आहे म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचले आहे."
ती पुढे म्हणाली, "मी अगदी मनापासून सांगत आहे. तुमचं कामच तुमची ओळख आहे. शेवटी प्रेक्षक ज्याच्याशी जोडले जातात तेच टिकतं आणि यशस्वी होतं. माझ्यासाठी बॉलिवूड एक अद्भूत व्यासपीठ आहे. इंडस्ट्रीतील लॉबिंगवर राणी म्हणाली, 'मी अशा गोष्टींपासून दूर राहते.'
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ए आर रहमान म्हणालेले की,"मी काम शोधतोय. माझ्याकडे काम यावं असं मला वाटतं. पण कामाच्या शोधात भटकणं मला अपशकुनी वाटतं. आजकाल जे लोक क्रिएटिव्ह नाहीत त्यांच्यात हातात निर्णय घेण्याची जबाबदारी दिली आहे. माझ्यासमोर असं झालेलं नाही पण हे कदाचित धर्मावरही अवलंबून असेल. मी हे बाहेरुन ऐकलं की मला एका प्रोजेक्टसाठी बुक करण्यात आलं होतं पण इंडस्ट्रीने इतर पाच संगीतकारांना कामवर ठेवलं. मी म्हणालो, 'वाह छान! आता मी आराम करु शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो.'
Web Summary : Rani Mukerji disagrees with A.R. Rahman's claim of religious bias in Bollywood, stating it's secular. She cites her 30-year career, emphasizing talent recognition over religious discrimination. Rahman alleged bias impacted his work opportunities.
Web Summary : रानी मुखर्जी ने ए.आर. रहमान के बॉलीवुड में धार्मिक भेदभाव के दावे से असहमति जताई। उन्होंने कहा कि यह धर्मनिरपेक्ष है। उन्होंने अपने 30 साल के करियर का हवाला देते हुए प्रतिभा को धार्मिक भेदभाव से ऊपर बताया। रहमान ने भेदभाव के कारण काम न मिलने का आरोप लगाया।