Join us

करिना कपूरला डेट करताना राणी मुखर्जीने सैफ अली खानला दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 17:17 IST

करिना कपूरच्या ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या रेडिओ टॉक शोमध्ये सैफने हा खुलासा केला होता.

 सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचं रिलेशनशीप २०१२ मध्ये समोर आला होते. दोघांचे आकर्षित व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाच्या कौशल्यांबद्दल चर्चा झाली. एकीकडे सैफला शब्दांचा राजा मानले जात होते तर दुसरीकडे करिना आपल्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. नंतर दोघांनी लग्न केले आणि बॉलिवूड इंडस्ट्रीचे पॉवर कपल झाले. लवकरच करिना तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. 

या दोघांच्या रिलेशनशीपची बातमी जेव्हा आऊट झाली  तेव्हा राणी मुखर्जीने सैफला एक सल्ला दिला होता. करिना कपूरच्याच ‘व्हॉट वूमन वॉन्ट’ या रेडिओ टॉक शोमध्ये सैफने हा खुलासा केला होता. करिनाच्या प्रश्नांना उत्तरे देताना सैफने सांगितले की, ‘मला आठवते, आपण दोघे डेट करत होतो तेव्हा राणीने मला एक सल्ला दिला होता. करिनाला डेट करताना व पुढे जाताना एक गोष्ट लक्षात ठेव, तू एका हिरोईनला नाही तर ‘हिरो’ला डेट करत आहेस, असे राणी मला म्हणाली होती.

स्त्री-पुरूष हा भेद करू नकोस, असा तिच्या म्हणण्याचा अर्थ होता. तुझ्या घरात दोन सुपरहिरो असतील. तू एका महिलेसोबत आयुष्य घालवणार आहेस, हे डोक्यातून काढून टाक. तुझ्याइतकीच मेहनत करणाºया एका व्यक्तीसोबत तू आयुष्य घालवणार आहेस,असे समजून पुढे गेलास तर घरात कुठलीही समस्या निर्माण होणार नाही, हे तिने मला समजावले होते. माझ्या मते, राणी एकदम योग्य बोलली होती.’

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर