बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या हिट सिनेमांचे सीक्वल आणण्याची चढाओढ दिसतेय. यापैकी अनेक सीक्वलही हिट होतात तर काही दणकून आपटतात. पण पोलिस ड्रामा असलेले सीक्वल मात्र कायम हिट ठरले आहेत. सलमान खानची ‘दबंग’ सीरिज असो वा अजय देवगणची ‘सिंघम’ सीरिज याचे एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा केव्हा चुलबुल पांडे व बाजीराव सिंघम पडद्यावर आलेत, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिले. आता राणी मुखर्जी ही सुद्धा या यादीत येणार आहे. होय, बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी लवकरच ‘मर्दानी’ या आपल्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येणार आहे. या चित्रपटात राणीने महिला पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारली होती.
पुन्हा एक सीक्वल! राणी मुखर्जी पुन्हा बनणार ‘मर्दानी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:01 IST
जेव्हा केव्हा चुलबुल पांडे व बाजीराव सिंघम पडद्यावर आलेत, तेव्हा तेव्हा प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रेम दिले. आता राणी मुखर्जी ही सुद्धा या यादीत येणार आहे. होय, बॉलिवूडची गुणी अभिनेत्री राणी लवकरच ‘मर्दानी’ या आपल्या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वल घेऊन येणार आहे
पुन्हा एक सीक्वल! राणी मुखर्जी पुन्हा बनणार ‘मर्दानी’!
ठळक मुद्दे२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी ’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात पोलिसाच्या भूमिकेत असलेली राणी सर्वांनाच खूप भावली होती.