Join us

RANGOON: शाहिद कपूर म्हणतो, चिखलात रोमान्स करण्याची देवाने कोणावरच वेळ आणू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 14:07 IST

शाहिद कपूर आणि कंगना राणौतचा ‘रंगून’मधील चिखलातील रोमान्स खूप गाजत आहे. पण तुम्हाला माहित आहे का की शाहिदला हा सीन किती अवघड गेला? हा सीन त्याच्यासाठी एवढा अवघड होता की, तो देवाकडे प्रार्थना करतो की, कोणावरच चिखलात रोमान्स करण्याची वेळ येऊ नये!

शाहिद कपूर पूर्णपणे भूमिकेत शिरून काम करणारा अभिनेता आहे. ‘चॉकलेट बॉय’ ते ‘सिरीयस अ‍ॅक्टर’ असा त्याचा प्रवास कौतुकास्पद आहे. पण पूर्णपणे भूमिकेत स्वत:ला झोकून देण्याचे काही वेळा अनेक तोटेदेखील आहे. ते कोणते याचा खुलासा खुद्द शाहिदने केला.आगामी ‘रंगून’ सिनेमातील शााहिद आणि कंगना राणौतचा चिखलातील रोमान्स खूप गाजत आहे. दोघांची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, की शाहिदला हा सीन किती अवघड गेला? हा सीन त्याच्यासाठी एवढा अवघड होता की, तो देवाकडे प्रार्थना करतो- कोणावरच चिखलात रोमान्स करण्याची वेळ येऊ नये!नुकतेच एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला, ‘चिखलात रोमान्स करण्याची कल्पना जरी कलात्मक वाटत असली तरी तो सीन चित्रित करणे मला फार जड गेले. कारण आमच्या अंगावर या सीनमध्ये १५ किलोपेक्षा जास्त चिखल टाकला जायचा. चिखलात लोळून, पडून, रोमान्सची इंटेन्सिटी दाखवायची होती. आता तुम्हीच सांगा की सगळ्या अंगावर चिखल लागलेला असताना उत्कट प्रेमभावना कशी आणायची? त्यामुळे देव करो की, कोणावरच अशी पाळी येऊ नये!’                                           विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात शाहिदसोबत कंगना राणौत आणि सैफ अली खान प्रमुख भूमिकेत आहेत. भारद्वाज यांच्यासोबत शाहिदचा हा तिसरा चित्रपट असून यापूर्वी दोघांनी ‘कमिने’ आणि ‘हैदर’ या दोन सिनेमांत एकत्र काम केलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात दुसऱ्या महायुद्धा दरम्यान घडणाऱ्या प्रेमकहाणीवर सिनेमा बेतलेला असून शाहिद यामध्ये सैनिकाच्या भूमिके त आहे. अत्यंत खडतर अशा परिस्थितीत अरुणाचल प्रदेशमध्ये चित्रिकरण करण्यात आलेले असून येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ALSO READ: ​अखेर कंगना राणौतला शाहिद कपूरने दिले खरमरीत उत्तर