‘लाल रंग’ मध्ये रणदीपचा ‘चोर बाजार’ लुक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 16:39 IST
रणदीप हुडा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल रंग’ मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला होता. ...
‘लाल रंग’ मध्ये रणदीपचा ‘चोर बाजार’ लुक !
रणदीप हुडा सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल रंग’ मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर आऊट करण्यात आला होता. या चित्रपटाचे विशेष म्हणजे यात रणदीपच्या लुकवर विशेष मेहनत घेण्यात आली आहे.त्याचे चित्रपटात वापरण्यात आलेले ड्रेस, फंकी गॉगल्स, चंकी बेल्ट्स, बोहेमियन शर्ट्स हे सर्व मुंबईच्या चोर बाजारातून निर्मात्यांनी विकत घेतल्याचे सुत्रांकडून कळते आहे. त्याच्या राहणीमानाबरोबरच त्याच्या भाषेवरही तितकीच मेहनत त्याने घेतली आहे. यात त्याने हरयाणाच्या ब्लड माफिआची भूमिका तो असून त्याच्या भूमिकेचे नाव ‘शंकर’ आहे. ही भूमिका निर्मात्यांना उत्तरेच्या ग्रामीण भागातील युवकांच्या राहणीमानाप्रमाणे करावयाची होती त्यामुळे या चित्रपटातील रणदीपचा हटके लुक विशेष आकर्षणाचा मुद्दा बनला आहे.