Join us

रणदीप हूडाची तारिफ पे तारिफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:46 IST

              या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'मसान' या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री रिचा चढ्ढाला अभिनेता ...

              या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'मसान' या चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री रिचा चढ्ढाला अभिनेता रणदीप हुडाची आदरयुक्त भिती वाटते. रणदीप आणि रिचा यांनी 'मै और चार्ल्स' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. रणदीपची तारिफ करताना रिचा म्हणते, 'अभिनय करत असताना रणदीप त्याच्या व्यक्तिरेखेवर घेत असलेली मेहनत पाहून मी आश्‍चर्यचकीत होते.              रणदीप खूपच सौम्य, सेक्सी आणि मेहनती आहे. या चित्रपटादरम्यान त्याच्या बॉडी लँग्वेजवर आणि भाषाशैलीवर त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. याखेरीज तो खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे. त्याला नुसते परफॉर्म करताना पाहूनच आपण त्याच्याकडून खूप काही शिकू शकतो.