Join us  

रणदीप हुडानं मांडला खऱ्याखोट्याचा हिशोब; 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 3:03 PM

अभिनेता रणदीप हुडा 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

अभिनेता रणदीप हुडा 'स्वातंत्र वीर सावरकर' या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात रणदीप हा वीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे.  विशेष म्हणजे याच सिनेमातून तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. त्यामुळे हा चित्रपट त्याच्यासाठी खास आहे. मात्र, या दरम्यान 'स्वातंत्र वीर सावरकर' चित्रपटाला प्रोपगंडा फिल्म म्हटले जात आहे. पण आता खुद्द रणदीपने या चर्चांवर मौन सोडलंय. 

नुकतेच रणदीपनं ANI ला मुलाखत दिली होती. यावेळी त्यानं सिनेमाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याला 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाला 'प्रपोगंडा फिल्म' म्हटलं जात आहे, याबद्दल काय सांगशील? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रणदीप म्हणाला, 'हा 'अँटी-प्रपोगंडा' चित्रपट आहे. सावरकरांविरोधात अनेक वर्षांपासून चालवलेला प्रपोगंडा, त्यांच्याबद्दल बोलल्यात आलेले वेगवेगळे शब्द त्या सर्वांचा भांडाफोड करण्यासाठी आणि सत्य लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट आहे'. 

रणदीपनं दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, 'सुरुवातीला अनेकांनी मला स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्यावरील चित्रपट करण्यास नकार देण्याचा सल्ला दिला होता. कारण, सिनेमामुळे राजकीय प्रतिमा निर्माण होईल आणि वादही निर्माण होतील, असं मला काही लोकांनी सांगितलं.  या गोष्टी ऐकूनच माझी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली'.

तर एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात रणदीपला " हे सरकार आलं आहे. त्यामुळे असे सिनेमे येत आहेत, असा आरोप तुझ्यावर कोणी केला का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, 'कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना, हा सिनेमा तयार करण्यासाठी मला कोणीही मदत केलेली नाही. या सिनेमासाठी मी माझं घर विकलं आहे. मी हा सिनेमा सावरकरांवर झालेला अन्याय दाखवण्यासाठी बनवला आहे. प्रपोगंडा चित्रपटासाठी एक-दीड वर्ष कोण मेहनत करतं? मी या सिनेमासाठी काय केलं आहे, ते मला माहिती आहे'.

येत्या २२ मार्च ला 'स्वतंत्र वीर सावरकर' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सुरुवातील चित्रपटाच्या दिग्दर्शनाची कमान महेश मांजरेकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती, परंतु त्यांनी स्वतःला चित्रपटापासून दूर केलं.अशा परिस्थितीत रणदीपने अभिनयासोबतच दिग्दर्शनाची जबाबदारीही स्वीकारली.या चित्रपटात रणदीपशिवाय अमित सियाल आणि अंकिता लोखंडे देखील दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदीसह मराठी भाषेतही ते पाहता येईल. 

टॅग्स :रणदीप हुडासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाविनायक दामोदर सावरकर