कॅटला ‘किस’ करण्यास रणबीरचा ‘नकार ’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 11:00 IST
पूर्वाश्रमीचे कपल कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर आता एकमेकांसोबत काम करण्यासही नकार देत आहे. सध्या त्यांचा ‘जग्गा जासूस’ चित्रपट ...
कॅटला ‘किस’ करण्यास रणबीरचा ‘नकार ’?
पूर्वाश्रमीचे कपल कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर आता एकमेकांसोबत काम करण्यासही नकार देत आहे. सध्या त्यांचा ‘जग्गा जासूस’ चित्रपट भलताच चर्चेत आहे. दोन वर्षांनंतर कसेबसे चित्रपटाची शूटिंग तर सुरू झाली आहे.तर आता त्यातही अनेक अडचणी समोर येत आहेत. सध्या ते दोघेही मोरोक्कोत चित्रपटाच्या आगामी शूटिंगसाठी आले असून तिथे म्हणे रणबीरने एका सीनसाठी कॅटरिनाला किस करण्यास नकार दिला.दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या या विषयावर काहीही बोलू इच्छित नाही. तो जरी खुप मोठ्या अडचणीतून जात असला तरीही त्याला त्याच्या अडचणींविषयी काहीही बोलायचे नाही.दिग्दर्शकांसोबतच चित्रपटाची टीमही तितकीच त्रस्त झाली असून कॅट-रणबीर यांच्यातील भांडणाला कंटाळली आहे.