करिना करिश्मासाठी शेफ झाले रणबीर-सैफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 19:44 IST
बॉलिवूडमध्ये कपूर खानदानचा काही औरच जलवा आहे. ते जे काही करतात त्याला मीडियात प्रसिद्धी मिळतेच. नुकतेच कपूर्सनी रणधीर कपूर ...
करिना करिश्मासाठी शेफ झाले रणबीर-सैफ
बॉलिवूडमध्ये कपूर खानदानचा काही औरच जलवा आहे. ते जे काही करतात त्याला मीडियात प्रसिद्धी मिळतेच. नुकतेच कपूर्सनी रणधीर कपूर यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र आले होते. या वाढदिवसानिमित्त बेबो आणि लोलो म्हणजेच करिना कपूर आणि करिश्मा कपूर या एकत्र पार्टी साजरी करताना दिसल्या. विशेष म्हणजे ही पार्टी कपूर्सनी घरीच साजरी केली होती. या पार्टीसाठी जेवन तयार करण्याची जबाबदारी दोन खास खानसाम्यांवर सोपविण्यात आली होती. हे खानसामे म्हणजे रणबीर कपूर आणि सैफ अली खान. आश्चर्य वाटलं, ना...या दोघांनी मिळून त्या दिवशी खास जेवण बनवले होते. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यानुसार, रणबीर कपूर, सैफ अली खान, करिना आणि करिश्मा यांच्यासह कपूर कुटुंबीयातील काही सदस्य शशी कपूर यांच्या घरी गेले होते. करिश्मा कपूर हिने आपल्या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरून या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या माध्यमातूनच या पार्टीमधील जेवनाची जबाबदारी रणबीर कपूर व सैफ अली खान यांनी सांभाळली होती याचा खुलासा झाला आहे. या फोटोमध्ये रणबीर व सैफ कुकच्या भूमिकेत दिसत असून त्यांच्या मागे आदर जैन देखील दिसत आहे. म्हणजेच या पार्टीचे औचित्य काही खास कारण असावे असे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पार्टीत करिश्मा तिचा कथित प्रियकर संदीप तोषनीवाल याच्यासोबत आली होती. रणधीर कपूरच्या पार्टीमध्येही संदीप तोषनीवाल याची उपस्थिती होती. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानही या पार्टीमध्ये उपस्थित होती. सैफ अली खान आपल्या बायकोची म्हणजेच करिनाची फार काळजी घेतो. तिच्या आग्रहास्तव त्याने या पार्टीचा शेफ होण्याचे मान्य केले. याशिवाय करिनाला तैमुरच्या संगोपनामध्येही मदत करतो. जेव्हा तैमुर अली खान पतौडीचा जन्म झाला तेव्हा सैफने खास पॅटर्निटी सुट्टी घेतली होती.