Join us

​समलैंगिक भूमिकेसाठी रणबीर सज्ज !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 12:47 IST

विविध भूमिका अगदी सजगतेने पार पाडणारा रणबीर एका आवानात्मक भूमिके साठी सज्ज होत आहे. ती आवाहनात्मक भूमिका म्हणजे समलैंगिकतेची. ...

विविध भूमिका अगदी सजगतेने पार पाडणारा रणबीर एका आवानात्मक भूमिके साठी सज्ज होत आहे. ती आवाहनात्मक भूमिका म्हणजे समलैंगिकतेची. ही भूमिका साकारण्यासाठी रणबीरने तयारी दर्शवून पुन्हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘कपूर अ‍ॅन्ड सन्स’ या चित्रपटामध्ये अभिनेता फवाद खानने साकारलेली भूमिका पाहता अशा भूमिकांसाठी आता कलाकारांना दारं खुली झाली आहेत’ असे रणबीर म्हणाला.‘वोग इंडिया’ या मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरने हे विधान केले आहे. ह्ययाआधी जर कोणी मला समलैंगिक भूमिकांसाठी विचारले असते तर मी बहुधा त्या भूमिका नाकारल्याच असत्या’ असेही रणबीर म्हणाला. मोठ्या पडद्यावर समलैंगिक भूमिका साकारण्याविषयी बोलताना ‘मी नक्कीच अशी भूमिका करेन. पण याआधीच अशी भूमिका फवादने साकारली आहे. त्याने ही भूमिका साकारत इतरांसाठी समलैंगिक भूमिकांचे दार खुले केले आहे’, असे रणबीर बोलला.याशिवाय सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठीही आपण तयार आहोत असेही या मुलाखतीत रणबीरने स्पष्ट केले. ‘उद्या जर राजकुमार हिरानी यांनी मला ‘मुन्नाभाई एमबीबीबीएस’मध्ये ‘सर्किट’ची भूमिका साकारायला सांगितली तर मी त्या पात्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन’, असे मत रणबीरने मांडले.