रणबीर-कॅटचा फनी व्हिडीओ व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 11:48 IST
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’ विषयी सध्या बॉलीवूडमध्ये प्रचंड चर्चा आहे. सेटवरचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रणबीर-कॅटचा फनी व्हिडीओ व्हायरल!
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांचा आगामी चित्रपट ‘जग्गा जासूस’ विषयी सध्या बॉलीवूडमध्ये प्रचंड चर्चा आहे. सेटवरचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते सध्या मोरोक्को येथे चित्रपटाची शूटिंग करत आहेत.त्यांनी ‘मराकेच’ मध्ये एक गाणे नुकतेच शूट केले आहे. हे गाणे अत्यंत फनी असून त्यांचे डान्स स्टाईल देखील खुप सुंदर वाटते. त्यांच्यात अनेक दिवसांपासून कुठल्याही प्रकारचा संवाद किंवा त्यांची जवळीक झालेली नाही.मागील २ वर्षांपासून चित्रपटाची शूटिंग सुरू असून आता चित्रपटाची तारीख केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वेल, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ फेम रणबीर - कॅटरिना यांच्या फनी जोडीला आॅनस्क्रीन पुन्हा पाहायला प्रेक्षक आतुर आहेत.