Join us

संजूबाबाच्या बायोपिकसाठी रणबीर-कॅट येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 11:46 IST

रणबीर कपूर हा संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्यास तयार झाला असून संजय दत्त या बायोपिकसाठी खुप उत्सुक ...

रणबीर कपूर हा संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये काम करण्यास तयार झाला असून संजय दत्त या बायोपिकसाठी खुप उत्सुक आहे, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रीला घ्यावयाचे आहे ? यावर विचार सुरू आहे.संजूबाबाला तर वाटतेय की, रणबीर जर त्याच्या रोल करणार असेल तर कॅटरिनाने मान्यताचा रोल करावा. याशिवाय चित्रपटाच्या टीमने कॅटला याविषयी विचारले आहे. तिला स्क्रिप्ट देखील देण्यात आली आहे.परंतु, अद्याप कॅटरिनाने चित्रपटासाठी अंतिम संमती दिलेली नाही. वेल, सर्वांची जरी इच्छा असली की, रणबीर-कॅटनी एकत्र यावे तरी ते त्यांना वाटले तरच एकत्र येतील..नाही का?