रणबीर कपूरच्या ‘या’ टी-शर्टच्या किमतीत विदेश भ्रमंती करून मायदेशी परतता येईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 18:44 IST
अभिनेता रणबीर कपूर नुकताच विमानतळावर बघावयास मिळाला असून, त्याने परिधान केलेल्या टी-शर्टची किंमत जाणून घेऊन तुम्हाला धक्का बसेल.
रणबीर कपूरच्या ‘या’ टी-शर्टच्या किमतीत विदेश भ्रमंती करून मायदेशी परतता येईल!
सुपरस्टार रणबीर कपूर नुकताच विमानतळावर व्हाइट टी-शर्ट आणि फेडेड जीन्समध्ये बघावयास मिळाला. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, रणबीरने टॅव्हल टाइमसाठी जे टी-शर्ट घातले त्याची किंमत किती आहे? रणबीरच्या प्लेन टी-शर्टच्या किमतीत कोणीही विदेश फिरून मायदेशी परतू शकेल. धक्का बसला ना... पण हे खरं आहे. एलेसेंड्रो मायकल यांनी डिझाइन केलेल्या या व्हाइट टी-शर्टची किंमत ३० हजार रूपये आहे. या टी-शर्टच्या किमतीत मुंबई ते बॅँकॉकचा प्रवास सहज करता येईल. वास्तविक मुंबई ते बॅँकॉक जाण्यासाठी केवळ आठ ते नऊ हजार रूपये इतका खर्च येतो. अशात या टी-शर्टच्या किमतीत मुंबई ते बॅँकॉक सहज जाता-येता येईल. रणबीरच्या शूजची प्राइज जाणून घेतल्यास तुम्हाला धक्का बसेल. रणबीरच्या नाईक कंपनीच्या शूजची किंमत जवळपास १.१४ लाख रूपये इतकी आहे. रणबीर लवकरच संजय दत्त याच्या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली असून, २९ जून रोजी संजय दत्तचा जीवनपट पडद्यावर बघता येणार. विधू विनोद चोपडा आणि राजकुमार हिरानी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे टायटल अद्यापपर्यंत घोषित केले नाही. सुरुवातीला या चित्रपटाचे ‘दत्त’ असे नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु हे नाव आता बदलण्यात आले आहे. चित्रपटात रणबीर संजूबाबाचा जीवनपट साकारत आहे. संजूबाबाचा लूक मिळविण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे.