Join us

ब्रेक-अप झाले तरीही रणबीर कपूर करतोय कॅटरिना कैफचा पाठलाग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2017 22:03 IST

अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील प्रेमसंबंध भलेही संपुष्टात आले असले तरी, रणबीरला कॅटच्या आठवणी खूपच त्रस्त करीत ...

अभिनेता रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्यातील प्रेमसंबंध भलेही संपुष्टात आले असले तरी, रणबीरला कॅटच्या आठवणी खूपच त्रस्त करीत आहे. कारण कॅटला विसरण्याचा तो कितीही प्रयत्न करीत असला तरी, त्याच्या मनात तिच्याविषयीची प्रेमभावना जागरूक होतेच. आता तुम्ही म्हणाल की हे सर्व तुम्हाला कसं माहीत? तर हे आम्ही सांगत नसून दस्तुरखुद्द रणबीरनेच सांगितले आहे. होय, रणबीरने नुकतेच कन्फेश केले की, तो सोशल मीडियावर कॅटरिनाला स्टॉक करीत असतो. मिड डेला दिलेल्या एका मुलाखतीत रणबीरने सांगितले की, मी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर वेगवेगळ्या नावाने आहे. असे करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्पर्धकाच्या प्रोफेशन आणि पर्सनल गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. माझ्या मते, हा एक स्मार्ट फॉर्म्युला आहे. यावेळी रणबीरने असेही सांगितले होते की, तो अनेक यूजर्सना स्टॉकही करतो. या लिस्टमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफचेही नाव असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. यावेळी रणबीरने हेही मान्य केले होते की, इन्स्टाग्रामवर त्याचे एकापेक्षा अधिक अकाउंट आहेत. रणबीरने म्हटले की, होय मी इन्स्टाग्रामवर आहे. मी एक स्टॉकर आहे. इंडस्ट्रीमध्ये ज्या काही हालचाली होतात, त्याविषयी मी या माध्यमातून नेहमीच जागरूक असतो. जो कॅटरिनाने इन्स्टा जॉइन केले होते तेव्हा मी तिचा तिसरा फॉलोअर होतो. यावेळी मी कॅटरिनाला असेही सांगितले होते की, तिने कोणते फोटो पोस्ट करायला हवे, परंतु माझ्या सल्ल्याला तिने के्रडिट देण्यास नकार दिला होता. जेव्हा केव्हा ती तिचा एखादा फोटो पोस्ट करते तेव्हा मी तिला फोन करून हाच फोटो पोस्ट करण्यामागचे कारण विचारतो. मला माहीत आहे की, कॅट सोशल मीडियाला खूपच गंभीरपणे घेते. रणबीरच्या या सर्व भावना लक्षात घेऊन तो आजही कॅटरिनाची प्रचंड काळजी घेत असून, तिला विसरणे त्याला अशक्य होत आहे. जेव्हा रणबीरला असे विचारण्यात आले होते की, तू सोशल मीडियावर का येत नाहीस? तेव्हा रणबीरने म्हटले होते की, मी खूपच लाजाळू आहे. तसेच त्याने हेही स्पष्ट केले होते की, मला स्वत:चे काम किंवा स्वत:ला प्रमोट करणे फारसे आवडत नाही. असो, सद्यस्थितीत पाहता असे वाटत नाही की, रणबीर सोशल मीडियावर येऊ शकेल. दरम्यान, कॅटरिना आणि रणबीर त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात झळकणार आहेत.