Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मला नाही वाटत की..."; रणबीर कपूरने 'रामायण' सिनेमाबद्दल मनातलं सांगितलं; प्रभू श्रीरामांविषयी काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 13:42 IST

Ramayana Teaser: रणबीरला भगवान श्रीरामांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अशातच रणबीर कपूरने हा टीझर पाहून आणि स्वतःला श्रीरामांच्या भूमिकेत पाहताच त्याचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला रणबीर?

 

आज रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमाचा (Ramayana Teaser) पहिला टीझर समोर आला. या टीझरमध्ये भगवान श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूरला पाहून चाहते थक्क झाले. या टीझरमध्ये रणबीरला भगवान श्रीरामांच्या भूमिकेत पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अशातच रणबीर कपूरने हा टीझर पाहून आणि स्वतःला श्रीरामांच्या भूमिकेत पाहताच त्याचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला रणबीर?'रामायण' सिनेमाच्या टीझर लाँच इव्हेंटमध्ये रणबीर कपूरने भावना व्यक्त करताना सांगितलं की, ''मला नाही वाटत की मी भगवान श्रीरामांचं प्रतिनिधित्व करतोय. मी त्यांच्याकडून शिकवण घ्यायला आलोय. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक साधेपणा आणि पवित्रता होती, जी खूप कमी बघायला मिळते. हे समजण्यासाठी स्वतःच्या आत डोकावण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे हा अनुभव चांगला होता.'' 

आज हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर 'रामायण' सिनेमाचा टीझर लाँच झाला. रणबीर कपूरला प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत सर्वांसमोर आणलं गेलं. नितेश तिवारींनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'दंगल', 'छिछोरे', 'बवाल', 'चिल्लर पार्टी' या गाजलेल्या आणि सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन नितेश तिवारींनी केलं आहे. त्यामुळे 'रामायण' सिनेमाच्या माध्यमातून नितेश तिवारी काय कमाल करतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. याच वर्षी दिवाळीत 'रामायण' सिनेमाचा पहिला भाग रिलीज होणार आहे. तर दुसरा भागात पुढील वर्षी अर्थात २०२७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir Kapoor on Ramayana: 'I don't think I represent Rama'.

Web Summary : Ranbir Kapoor, starring as Lord Rama in the upcoming 'Ramayana' film, expressed humility at the teaser launch. He stated he's learning from Lord Rama's simplicity and purity, seeking inner understanding for the role. The film, directed by Nitesh Tiwari, releases this Diwali.
टॅग्स :रणबीर कपूररामायण सिनेमाबॉलिवूड