रणबीर कपूरला मिळाली सर्वात मोठी शाब्बासकी! कुणाची हे जाणून घ्यायचे असेल तर पाहा व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 11:17 IST
रणबीर कपूर याचा आगामी चित्रपट ‘संजू’चा टीजर तुम्ही पाहिला असेलच.या टीजरने केवळ रणबीरच्या चाहत्यांचीच नाही तर सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे.
रणबीर कपूरला मिळाली सर्वात मोठी शाब्बासकी! कुणाची हे जाणून घ्यायचे असेल तर पाहा व्हिडिओ!!
रणबीर कपूर याचा आगामी चित्रपट ‘संजू’चा टीजर तुम्ही पाहिला असेलच.या टीजरने केवळ रणबीरच्या चाहत्यांचीच नाही तर सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे. अगदी रणबीरचे डॅड ऋषी कपूर आणि मॉम नीतू कपूर यांची सुद्धा. राजकुमार हिराणी व विधू विनोद चोप्रा यांनी अलीकडे ऋषी कपूर व नीतू कपूर यांना ‘संजू’चा टीजर दाखवला. अन् या टीजरने व्हायची ती किमया घडवली. होय, हा टीजर पाहिल्यानंतर ऋषी कपूर यांनी रणबीरची चक्क प्रशंसा केली. आता तुम्ही म्हणाल, बापाने मुलाची प्रशंसा केली, त्यात इतके काय. पण ही प्रशंसा आपल्याला इतकी सहज घेता येणार नाही. होय, कारण रणबीर ऋषी यांचा मुलगा असला तरी ते फार क्वचित त्याची प्रशंसा वा कौतुक करतात. रणबीरच्या कौतुकापेक्षा ते त्याचे कान ओढतांनाच अधिक दिसतात. अर्थात यामागे त्यांचा ’परफेक्शन’चा आग्रह असतो. म्हणजेच रणबीरकडून त्यांना अगदी ‘परफेक्ट‘ अभिनयाची अपेक्षा असते. ‘संजू’च्या टीजरने कदाचित ऋषी यांची ही अपेक्षा पूर्ण केली. कारण असे नसते तर हा टीजर पाहिल्यानंतर ते भावूक झाले नसते. त्यांच्या या रिअॅक्शनचा व्हिडिओ रविवारी आयपीएल समारोपाप्रसंगी सगळ्यांनीच पाहिला़ या आयपीएल फिनाले पार्टीत रणबीर कपूर होस्ट होता़ ‘संजू’च्या प्रमोशनसाठी तो तिथे पोहोचला होता़‘संजू’चा टीजर पाहिल्यानंतर ऋषी कमालीचे भावूक झालेत आणि त्यांनी अगदी मनातून रणबीरची प्रशंसा केली. रणबीरने ‘संजू’चे आपल्यातील सर्वोेत्तम दिले आहे. मला त्याचा अभिमान वाटतो आहे. शपथेवर सांगतो की, अख्ख्या टीजरभर जणू संजय दत्त वावरतो आहे, असेचं मला वाटले, असे ऋषी व्हिडिओत म्हणताहेत. रणबीर तू ऐकत असशील तर मी तुला सांगू इच्छितो की, मी किती भावूक झालोय, असेही ऋषी यांनी यात म्हटले आहे. एकंदर काय तर डॅडकडून रणबीरला पहिल्यांदा शाब्बासकी मिळाली आहे. वडिलांकडून मिळालेल्या या शाब्बासकीपेक्षा रणबीरसाठी आणखी मोठे काय असू शकते?