रणबीर कपूरने वाढवले 13 किलो वजन संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 12:36 IST
रणबीर कपूर संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करतोय हे आपल्याला सगळ्यांच माहिती आहे. संजय दत्त सारखे दिसण्यासाठी रणबीर ...
रणबीर कपूरने वाढवले 13 किलो वजन संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करताना
रणबीर कपूर संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटात काम करतोय हे आपल्याला सगळ्यांच माहिती आहे. संजय दत्त सारखे दिसण्यासाठी रणबीर विशेष मेहनत घेतो आहे. यासाठी रणबीरने आपले वजन ही वाढवले आहे. रणबीरने आतापर्यंत स्वत:चे 13 किलो वजन वाढवले आहे. संजय दत्त जेव्हा पुण्याच्या येरवडा कारागृहात होता त्यादरम्यान त्याचे वजन प्रचंड वाढले होते. यामुळे संजय दत्तची भूमिका चित्रपटात साकारताना रणबीरला वजन वाढवावे लागले आहे. रणबीरला वजन वाढवण्यासाठी त्याचा ट्रेनर कुणार गिर मदत करतो आहे. रात्री 3 वाजायच्या सुमारास रणबीर उठून प्रोटीन शेक घेतो आणि पुन्हा झोपतो. दिवसातून किमान दीड तास रणबीर वर्क आउट करत असल्याचे ही समजलेय. संजय दत्तच्या बायोपिकबाबत रणबीर नेहमीच भरभरुन बोलतो. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित बायोपिक तुम्हाला काहीतरी शिकवून जाईल असा विश्वास रणबीरने याआधीच व्यक्त केला आहे. याचित्रपटातून बाप-लेकाच्या परस्परांशी असलेल्या नात्याबाबत, मित्रांसोबत असलेले संबंध. आयुष्यात आलेल्या माहिला, गंभीर आरोप आणि त्यामुळे सोसावी लागलेला मानसिक त्रास हे सगळे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान संजय दत्तने सेटवर विझिट देते सगळ्यांना सरप्राईज दिल होते. संजयला सेटवर पाहून चित्रपटाची संपूर्ण टीम सरप्राईज झाली होती. प्रत्येक शॉर्टनंतर रणबीर कपूर संजय दत्तला शॉर्ट ओके आहे की नाही असे आवर्जून विचारत होता. यावेळी संजय दत्तने रणबीरचे कौतुकदेखील केले. या चित्रपटाचे निर्माते विधु विनोद चोप्रा आहेत तर दिग्दर्शक राजकुमार हिरानी आहे.याआधी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या आमिरच्या दंगल या चित्रपटासाठी आमिरने देखील वजन वाढवले होते. मिस्टर परफेक्शनिस्टने आपले वजन चित्रपटाच्या चित्रकरणा दरम्यान 97 किलो केले होते. दंगलमध्ये आमिरने कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारली होती. चित्रपट तयार झाल्यानंतर आमिर पुन्हा 65 किलोवर आला होता. हॉलिवूडप्रमाणे सध्या बॉलिवूडमध्ये ही भूमिकेच्या गरजेनुसार कलाकार स्वत:मध्ये अनेक बदल करताना दिसतात. हॉलिवूडमधले हिरो भूमिकेच्या मागणीनुसार वजन वाढवतात, वजन कमी करतात कधी कधी तरी सर्जरी पण करतात.