Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 09:05 IST

रणबीर कपूरची 'रामायणम्'वर सविस्तर प्रतिक्रिया

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम्' सिनेमाची पहिली झलक हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी समोर आली. २ एप्रिल रोजी भारतात सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. या टीझरवर काही मिनिटातच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. अनेकांनी रणबीर कपूरचा प्रभू श्रीरामाच्या भूमिकेतील लूक पसंतीस पडला. 'राम' असं टीझरला नाव देण्यात आलं. त्याप्रमाणे संपूर्ण टीझरमध्ये फक्त रणबीरचेच जास्त सीन्स दिसले. दरम्यान सिनेमात आपली दुहेरी भूमिका असल्याचा खुलासा रणबीरने केला आहे. 

ही संधी मिळणं शानदार होतं

'रामायणम्'ची पहिली झलक 'राम'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल असल्याच्या चर्चा खऱ्या आहेत. रणबीरनेच यावर शिक्कामोर्तब केले आहे. या सिनेमात तो फक्त श्रीराम नाही तर प्रभू विष्णूचा अवतार परशुरामाच्याही भूमिकेत दिसणार आहे. 'कोलायडर'शी बोलताना रणबीर कपूर म्हणाला, "भगवान विष्णूचे १० अवतार मानले आहेत. त्यातील प्रभू श्रीराम आणि प्रभू परशुराम हे दोन अवतार झाले. परशुराम हे श्रीरामाच्या आधीचे अवतार होते. या दोन्ही भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे कमाल होतं. मला वाटतं एक अभिनेता म्हणून भूमिका करताना कॅरेक्टरच्या बॉडी लँग्वेजशिवाय त्याची अध्यात्मिकता, भावनांची व्याप्तीही समजते. तिथूनच भूमिकेची तयारी सुरु होते. मी सुद्धा हेच केलं. या भूमिका, त्यांची मूल्ये, उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मग सर्व काही सुरळीत झालं."

श्रीरामाची भूमिका साकारणं मोठी जबाबदारी

तो पुढे म्हणाला, "ही एक अशी जबाबदारी आहे जी आपण खांद्यावर घेतली आहे. वास्तविक पाहता तुम्ही त्या भूमिकेचा अभिनयच नाही तर प्रतिनिधित्व करत आहात, आपली गोष्ट सांगत आहात. अभिनेता म्हणून प्रभू श्रीरामाचं रुप सादर करत आहात. म्हणूनच एक कलाकार आणि एक भारतीय म्हणून ही माझी जबाबदारी, उद्देश, आस्था आणि विश्वास आहे जिथून सगळ्याची सुरुवात होते. 

'रामायणम्'च्या टीझरमध्ये श्रीरामाचा योद्ध्यापासून ते राजा बनण्यापर्यंतचा प्रवास दिसतो. यामध्ये तो दैत्य आणि राक्षसांशी लढतो. तसंच शेवटी युद्धाचाही सीन दिसतो. वनवासाला निघतानाचीही झलक दिसते २ मिनिटांच्या या टीझरमधूनच रणबीरने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सिनेमात साई पल्लवी सीतेच्या तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. अरुण गोविल हे राजा दशरथाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सनी देओल, यश, लारा दत्ता, आदिनाथ कोठारेसह आणखी मोठी स्टारकास्ट आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir Kapoor in 'Ramayan': Double Role as Ram and Parashurama!

Web Summary : Ranbir Kapoor confirms double role in 'Ramayan' as Lord Rama and Parashurama. He discusses understanding the spirituality and responsibility of portraying these avatars. The teaser showcases Rama's journey and battles.
टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडरामायण सिनेमा