Join us

न्यूयॉर्कमध्ये रणबीर कपूर संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्षण करणार शूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 20:51 IST

सध्या अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट १३ जुलै रोजी ...

सध्या अभिनेता रणबीर कपूर त्याच्या आगामी ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा हा चित्रपट १३ जुलै रोजी रिलीज होणार आहे. त्यामुळे त्याने संजय दत्त बायोपिकमधून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र आता तो पुन्हा न्यूयॉर्कला जाणार असून, याठिकाणी तो ‘दत्त’ची शूटिंग करणार आहे. वास्तविक ही शूटिंग संजूबाबाच्या आयुष्यातील अतिशय वाईट दिवसांची असेल. वास्तविक रणबीरचे न्यूयॉर्कला जाण्याचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे ‘दत्त’ची शूटिंग आणि दुसरे म्हणजे आयफा २०१७. रणबीर अवॉर्ड फंक्शन दरम्यानच ‘दत्त’ चित्रपटातील काही सीन शूट करणार आहे. हा सीन संजूबाबाच्या आयुष्यातील अतिशय खडतर क्षणावर आधारित आहे. जेव्हा संजूबाबा ड्रग्सच्या आहारी गेला होता, तेव्हाचे क्षण शूट केले जाणार आहे. वास्तविक हे सर्व दृश्य ८० च्या दशकातील असतील. जेव्हा संजूबाबाने ‘रॉकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती, तेव्हा तो ड्रग्जच्या आहारी गेला होता. न्यूयॉर्कमध्ये प्रमाणापेक्षा अधिक ड्रग्ज घेतल्याने त्याला रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. हे सर्व काही रणबीर न्यूयॉर्कमध्ये शूट करणार आहे. असो सध्या रणबीर प्रचंड व्यस्त असून, ‘दत्त’ बायोपिकबरोबरच त्याला ‘जग्गा जासूस’चेही प्रमोशन करावे लागत आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या चित्रपटात रणबीरसोबत त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफही प्रमुख भूमिकेत असेल. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची शूटिंग केली जात होती. काही ना काही अडथळे येत असल्याने हा चित्रपट रिलीज करण्यास विलंब झाला. या चित्रपटाचे प्रोड्युसर म्हणून रणबीर काम करीत आहे. रणबीरच्या मते, अनुरागने ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाला ‘बर्फी’ या चित्रपटापेक्षा उत्कृष्ट बनविले आहे. बर्फीमध्ये रणबीर आणि प्रियंका चोपडाची केमिस्ट्री बघावयास मिळाली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. आता ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीर आणि कॅट हे दोघे असून, त्यांना प्रेक्षक कितपत पसंत करतील, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.