Join us

रणबीर कपूरने 'सांवरिया'मधून नाही तर या सिनेमातून केले होते पदार्पण, तब्बल १७ वर्षांनी झाला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 11:14 IST

२००७ साली दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या सांवरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हा त्याचा पहिला चित्रपट नाही.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. २००७ साली दिग्दर्शक संजय लीला भन्साळीच्या सांवरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र हा त्याचा पहिला चित्रपट नाही. या चित्रपटाच्या आधी रणबीरने एका चित्रपटात काम केले होते. त्याचा हा चित्रपट तब्बल १७ वर्षांनी रिलीज होतो आहे. 

रणबीर कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वी ऑस्कर नामांकित चित्रपटात काम केले होते. सांवरिया सिनेमाच्या आधी रणबीर कपूरने कर्मा या लघुपटातही काम केले होते.  २००४ साली रिलीज झालेल्या कर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माता बी.आर.चोप्रा यांचे नातू अभय चोप्रा यांनी दिग्दर्शन केले होते. या काळात रणबीर कपूर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होता. या चित्रपटासाठी स्टुडंट ऑस्करसाठीही नामांकन देण्यात आले होते. रणबीरची ही शॉर्ट फिल्म केवळ २ मिनिटांची होती, यात रणबीर कपूर व्यतिरिक्त शरद सक्सेना, मिलिंद जोशी, सुशोवन बॅनर्जी सारख्या कलाकारांनी अभिनय केला होता.

कर्मा चित्रपटाचे दिग्दर्शन अभय चोप्रा यांनी केले असून या चित्रपटामध्ये वडील आणि मुलगा यांच्यातील नाते संबंध रेखाटण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या मुलाला मृत्यूदंड ठोठावला जातो, तेव्हा त्याच्या वडिलांना किती त्रास होतो, हे या लघुपटात दाखवण्यात आले होते. त्यावेळी काही कारणांमुळे हा लघुपट प्रदर्शित झाला नव्हता. पण आता बर्‍याच वर्षांनंतर हा चित्रपट ‘वांद्रे फिल्म फेस्टिव्हल’  या यूट्यूब वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तो ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

टॅग्स :रणबीर कपूर