रणबीर आपल्या एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफप्रमाणे आलिया भट्टसोबत सुद्धा राहणार लिव्ह इनमध्ये ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 12:17 IST
सध्या बॉलिवूड खास चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांबद्दल काही न ...
रणबीर आपल्या एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफप्रमाणे आलिया भट्टसोबत सुद्धा राहणार लिव्ह इनमध्ये ?
सध्या बॉलिवूड खास चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्टची. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांबद्दल काही न काही बातमी ऐकायला मिळतेय. ते दोघे हे त्यांच्यातील असलेल्या नात्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुजोरा देताना दिसतायेत. आलिया -रणबीर सोनम कपूरच्या रिसेप्शनला एकत्र दिसले आणि त्यानंतर चर्चांना आणखीन उधाण आले. त्याच्या बोलण्यातून नात्याबद्दल ते दोघेही संवेदनशील आहेत हे कळले. याच बरोबर सध्या बी टाऊन एक वेगळीच चर्चा सुरु आहे. रणबीर कपूर त्याची एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफसोबत जसा लिव्ह इनमध्ये राहत होता तसेच तो आलिया भट्ट बरोबरसुद्धा राहणार की लग्न करून एकत्र राहणार? याचे उत्तर आलियाने एक मुलाखतीतून दिले. आलिया भट्ट मीडियाशी बोलताना म्हणाली की "मी लग्नासाठी कोणतीही तारीख अजून नक्की केलेली नाही कारण त्याचा मला फारसा फरक देखील पडत नाही. माझे असे मानणे आहे की, मी एखाद्यावर प्रेम करत असेन तर सरळ जाऊन त्याला सांगेन आणि त्याच्यासोबत लग्न करेन. मला लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहायचे नाहीय. जोपर्यंत मी त्या व्यक्तिसोबत लग्न करत नाही तोपर्यंत मी त्याच्यासोबत राहणार नाही.आता तुम्हाला कळलेच असेल रणबीर मागच्या रिलेशनशीपसारखा आलियासोबत लिव्हइनमध्ये राहू शकणार नाही. ALSO READ : see pics :रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!जेव्हा कॅटरिना आणि रणबीर रिलेशनशिप मध्ये होते तेव्हा त्यांच्या लिव्हइनचे किस्से भरपूर रंगले होते. त्यादोघांनी मुंबईमध्ये एक घर सुद्धा घेतले होते. रणबीर आपल्या आई-वडिलांना सोडून या घरात शिफ्ट झाला होता. हे नाते जास्त काळ टिकू शकले नव्हते आणि रणबीर परत ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्यासोबत घरी राहायला गेला. पुढे बातमी अशी पण आली होती की रणबीरच्या या निर्णयामुळे त्याचे आई -वडिल खास करून वडील ऋषी कपूर खुश नव्हते. आलियाबद्दल बोलायचे झाले तर संपूर्ण कपूर कुटुंब या नात्याला घेऊन खुश दिसुन येत आहे. रणबीरचे कुटूंब सतत आलियाची स्तुती करताना दिसत आहे. सध्या आलिया आणि रणबीर कपूर आयन मुखर्जीच्या ब्राह्मस्त्र चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.