Join us

​रणबीर कपूर नाही तर ‘हे’ आहे माहिरा खानचे पहिले प्रेम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 13:18 IST

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही अगदी तिच्या बॉलिवूड डेब्यूपासून चर्चेत आहे ती आत्तापर्यंत. काल-परवा तिचे अन् रणबीर कपूर या ...

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ही अगदी तिच्या बॉलिवूड डेब्यूपासून चर्चेत आहे ती आत्तापर्यंत. काल-परवा तिचे अन् रणबीर कपूर या दोघांचे स्मोकिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत अन् माहिरा आणखीच चर्चेत आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये रणबीर कपूर व माहिरा खान दोघेही स्मोकिंग करताना दिसत आहेत. माहिरा यात एका शॉर्ट  बॅकलेस ड्रेसमध्ये आहे. तिचे हे फोटो झूम करून बघितल्यानंतर तिच्या शरिरावर काही ‘लव्ह बाईट्स’ही स्पष्ट दिसत आहेत. माहिराचे रणबीरसोबतचे हे फोटो,  आणि तिच्या पाठीवरचे हे ‘लव्ह बाईट्स’ पाहिल्यानंतर तिच्या अन् रणबीरच्या रिलेशनशिपच्या चर्चेतला ऊत आलाय. पण खरे सांगायचे तर माहिराचे पहिले प्रेम रणबीर नाही तर दुसरेच कुणी आहे. हे प्रेम कोण? तर अभिनेता गुरू दत्त. होय, गुरू दत्त हा माहिराचा आवडता अभिनेता. १६ वर्षांची असतांनापासून माहिराला गुरुदत्त आवडतो. माहिराने गुरुदत्त यांचा ‘प्यासा’ हा चित्रपट बघितला आणि ती गुरुदत्तच्या प्रेमात पडली. हा चित्रपट बघितल्यानंतर माहिराने साहिर लुधियानवी यांच्या कविता वाचणे सुरु केले.ALSO READ : माहिरा खान, पाकिस्तान से दफा हो जाओ!! रणबीर कपूरसोबतचे फोटो व्हायरल होताच पाकी युजर्सची भडकली माथी!माहिरा खान भारतात पहिल्यांदा चर्चेत आली होती ते तिच्या ‘हमसफर’ या टीव्ही शोमुळे. ‘जिंदगी’ चॅनलवरील या शोमध्ये ती पाकिस्तानी अभिनेता फवाद खानसोबत दिसली होती. फवाद आणि माहिराच्या या जोडीला भारतीय प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. यानंतर माहिराने शाहरूख खानसोबत ‘रईस’मधून डेब्यू केला, तेव्हा ती चर्चेत आली.माहिराच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे तर २००७ मध्ये माहिराने अली अस्करीसोबत लग्न केले. मात्र तिचे लग्न फार काळ टिकले नाही. २०१५ मध्ये दोघांचाही ‘तलाक’ झाला. माहिराचा एक मुलगा आहे. २०१४ मध्ये जन्मलेल्या तिच्या या मुलाचे नाव आहे अजलान. माझा मुलगा हीच माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. त्यामुळे मी एकदा केवळ एकच चित्रपट करते.