Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ॲनिमल पार्क'चं कधी सुरु होणार शूट? रणबीर कपूरने दिली अपडेट, 'दिग्दर्शक सध्या...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 14:08 IST

रणबीर कपूरचा डबल रोल, कधी येणार 'ॲनिमल पार्क'?

संदीप रेड्डी वांगाच्या 'ॲनिमल' सिनेमामुळे रणबीर कपूरच्या करिअर सावरलं. अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर रणबीरला या सिनेमाने तारलं असं म्हणता येईल. या सिनेमात रणबीर कधीही न दिसलेल्या भूमिकेत होता. इंटिमेट, न्यूड सीनमुळेही तो चर्चेत  आला होता. ॲनिमलचा पुढचा पार्ट कधी येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. रणबीरने नुकतंच यावर अपडेट दिलं आहे.

डेडलाईन हॉलिवूडशी बोलताना रणबीर कपूर म्हणाला, "संदीप रेड्डी वांगा सध्या प्रभाससोबतच्या 'स्पिरीट' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. ॲनिमल पार्कचं शूट आम्ही २०२७ मध्ये सुरु करु असं अंदाज आहे. सध्या याला बराच वेळ आहे. वांगा यांना सिनेमा तीन पार्टमध्ये बनवायचा होता. दुसऱ्या पार्टचं नाव अॅनिमल पार्क असणार आहे हे सगळ्यांना माहितच आहे. तिसऱ्या पार्टच्या टायटलबद्दल अद्याप माहिती नाहीये."

'ॲनिमल पार्क'मध्ये काय बघायला मिळणार? यावर रणबीर कपूर म्हणाला,"मी पहिल्या सिनेमापासूनच दिग्दर्शकासोबत नेहमीच माझ्या आयडिया शेअर करतो. दिग्दर्शकाला गोष्ट कुठपर्यंत न्यायची आहे यावर विचार सुरु आहे. दुसरा पार्ट खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण मला हिरो आणि व्हिलन अशा दोन्ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. हा खूप एक्सायटिंग प्रोजेक्ट आहे आणि दिग्दर्शकही खूप ओरिजनल आहे. मी या सिनेमाचा भाग असल्यामुळे खूप खूश आहे."

रणबीर सध्या 'लव्ह अँड वॉर'चं शूट करत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी येणार आहे. शिवाय त्याचा बहुचर्चित 'रामायण' सिनेमाही रिलीज होणार आहे. यानंतरच तो 'ॲनिमल पार्क'चं चित्रीकरण सुरु करणार आहे. तसंच 'ब्रह्मास्त्र २' सिनेमाही रांगेत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Animal Park: Ranbir Kapoor reveals when filming will begin.

Web Summary : Ranbir Kapoor's 'Animal Park' shoot is slated for 2027, after director Sandeep Reddy Vanga completes 'Spirit' with Prabhas. Ranbir will play both hero and villain, expressing excitement for the unique project and his collaboration with Vanga. He's currently filming 'Love & War' and 'Ramayana'.
टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूड