...तेव्हा कॅटच्या प्रेमात पडला रणबीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 10:56 IST
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांना एक ‘बेस्ट कपल’ म्हणून पाहिले जायचे. त्यांच्या ब्रेकअप नंतर त्यांनी एकत्र काम करणेही ...
...तेव्हा कॅटच्या प्रेमात पडला रणबीर!
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांना एक ‘बेस्ट कपल’ म्हणून पाहिले जायचे. त्यांच्या ब्रेकअप नंतर त्यांनी एकत्र काम करणेही बंद केले होते. मात्र, ‘जग्गा जासूस’ मुळे ते पुन्हा एकदा एकत्र आले.नुकतेच एका मुलाखतीदरम्यान बोलताना रणबीरने सांगितले की,‘ जेव्हा मी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ चे शूटींग करत होतो तेव्हा मी कॅटरिनाच्या प्रेमात पडलो होतो. शेवटी मलाही हृदय आहेच ना?माझ्या आईवडीलांनंतर माझ्या आयुष्यात कॅटच माझ्यासाठी प्रेरणा होती. पण, काळाच्या ओघात आमच्यात दुरावा येत गेला आणि आम्ही ब्रेकअप घेतला.’