Join us

रणबीरनं युरोपमध्ये सेलिब्रेट केला आई Neetu Kapoorचा बर्थडे, आलियानं सासूबाईंना असं केलं विश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:19 IST

अभिनेता रणबीर कपूरने आपल्या आईचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झालेत.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री नीतू कपूर आज त्यांचा 65 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता रणबीर कपूरने आपल्या आईचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर झालेत.  सुपरस्टार रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूरचा 65 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इटलीला गेला होते. हा फोटो शेअर करत नीतू कपूर यांनी सून आलिया आणि नात राहा कपूर मिस केल्याचं म्हटलंय. 

 हा फोटो शेअर करत नीतू कपूर यांनी लिहिले की, 'खूप सुंदर दिवस होता.. आलिया भट आणि बेबी राहा कपूरला खूप मिस केले.' या फोटोवर कमेंट करताना आलियाने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. 

 अभिनेत्री आलिया भटने नीतू कपूर यांचा एक सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.  'हॅपी बर्थडे क्वीन. तुम्ही सर्व काही खास बनवता. तुम्हाला खूप खूप प्रेम.' असं कॅप्शन तिने या फोटोसोबत दिलं आहे. 

सासू-सुनेचं बॉन्डिंग अनेकवेळा दिसलं आहे. दोघी अनेकवेळा सर्वाजनिक ठिकाणी एकत्र दिसतात. मात्र आलिया आणि राहा या ग्रँड बर्थ डे सेलिब्रेशनचा भाग नव्हत्या. यामागचे कारण काय, हे सध्यातरी समोर आलेले नाही. आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर अभिनेत्री नीतू कपूर यांचा हा दुसरा वाढदिवस आहे. ज्यामध्ये त्यांची सून उपस्थित राहू शकली नाही. गेल्या वेळीही अभिनेत्रीने तिचा वाढदिवस कपूर कुटुंबासोबत लंडनमध्ये साजरा केला होता. जिथे त्यांचा लेक-जावई आणि मुलगा होता, त्यावेळी ही आलिया उपस्थित नव्हती.

 

टॅग्स :नितू सिंगआलिया भटरणबीर कपूर