Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अयोध्येनेच माझी निवड केली..."; रणबीर कपूरने रामनगरीत केला मोठा व्यवहार, घेतला 'इतक्या' कोटींचा प्लॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 08:49 IST

रणबीरने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे जमिनीचा एक तुकडा खरेदी केला असून जमीन खरेदी करताना रणबीरची भावुक प्रतिक्रिया समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर

अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे. 'रामायण' चि दिवाळीत रिलीज होत असतानाच रणबीरच्या आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे. रणबीरने उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे प्लॉट खरेदी केला आहे. याशिवाय रणबीरने याविषयी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घ्या रणबीरच्या या व्यवहाराविषयी

३.३१ कोटी रुपयांची गुंतवणूक

एका अधिकृत निवेदनानुसार, रणबीर कपूरने अयोध्येत २,१३४ चौरस फूट जमिनीचा तुकडा सुमारे ३.३१ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. हा प्लॉट 'द सरयू' (The Sarayu) प्रोजेक्टचा एक भाग असून, हा खास प्रोजेक्ट शरयू नदीच्या काठी ७५ एकर परिसरात पसरलेला आहे. या गुंतवणुकीबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, "माझा असा विश्वास आहे की अयोध्येनेच माझी निवड केली आहे. मी फक्त त्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. अयोध्या आपल्या इतिहासात खोलवर रुजलेली आहे आणि आपल्या सांस्कृतिक रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. 'द सरयू' मधील ही जमीन माझ्या कुटुंबासाठी एक महत्वाचा गोष्ट असेल."

अमिताभ बच्चन यांचीही मोठी गुंतवणूक

रणबीर कपूरच्या आधी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही अयोध्येत मालमत्ता खरेदी केली आहे. बच्चन यांनी २०२५ मध्ये अयोध्येत ४० कोटी रुपयांना २५,००० चौरस फुटांचा एक प्लॉट खरेदी केला होता. याशिवाय, त्यांनी 'द सरयू' प्रोजेक्टमध्येही १४.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून ५४,००० चौरस फुटांचा प्लॉट आपल्या वडिलांच्या (हरिवंश राय बच्चन) ट्रस्टच्या नावाने खरेदी केला आहे.

रणबीर कपूरचे आगामी चित्रपट

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात भगवान श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तो संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात आलिया भट आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान रणबीरने अयोध्येत जमीन खरेदी केल्याने अनेकांनी त्याचं अभिनंदन केलंय.

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir Kapoor buys land in Ayodhya, calls it divine selection.

Web Summary : Ranbir Kapoor, starring in 'Ramayana,' purchased land in Ayodhya for ₹3.31 crore. He sees it as a divine calling. Amitabh Bachchan also invested heavily in Ayodhya real estate.
टॅग्स :रणबीर कपूरअयोध्याबॉलिवूडव्यवसायजमीन खरेदी