या चित्रपटात सुनील दत्त यांची भूमिका परेश रावल तर नर्गिस यांची भूमिका मनीषा कोईराला ही करीत आहे. अनुष्का शर्मा एका पत्रकाराची भूमिका करते आहे. सोनम कपूर ही संजय दत्तच्या प्रेमिकेची भूमिका साकारत आहे. रॉकी चित्रपटानंतर संजय दत्त कशा पद्धतीने पुढे आला, हे चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. त्याशिवाय संजय दत्तला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी झालेल्या शिक्षेसंदर्भातही माहिती देण्यात आली आहे.गेल्या महिन्यात रणबीर कपूर भोपाळमध्ये आला असता त्याच्या फॅन्सनी काढलेला फोटो शेअर केला आहे. चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो व्हायरल झाला होता.#Duttbiopic Ranbir and Rajkumar Hirani on set in Bhopal pic.twitter.com/5oAVTJGh5y— RanbirKapoor.Net (@RanbirKapoorFC) March 9, 2017
रणबीर कपूर राहणार भोपाळ जेलमध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2017 17:58 IST
तुम्ही वाचताय ते खरे आहे! आश्चर्य वाटले ना तुम्हाला, परंतु कोणत्या कारणासाठी? रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम ...
रणबीर कपूर राहणार भोपाळ जेलमध्ये?
तुम्ही वाचताय ते खरे आहे! आश्चर्य वाटले ना तुम्हाला, परंतु कोणत्या कारणासाठी? रणबीर कपूर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये काम करतो आहे. येरवडा जेलमध्ये संजय दत्त असताना त्याने कसे आयुष्य काढले ही माहिती घेण्यासाठी तो सहा दिवस भोपाळ जेलमध्ये राहण्याची शक्यता आहे.१९९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्ट केस प्रकरणात संजय दत्त याला पाच वर्षाची शिक्षा झाली होती. गतवर्षीच संजय दत्तने आपली शिक्षा पूर्ण केली आणि आता तो नव्या चित्रपटाची शूटिंग करतो आहे.