रणबीर कपूर दिसणार क्रांतिकारकाच्या भूमिकेत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:37 IST
शुजीत सरकार आणि रणबीर कपूर लवकरच एकत्र काम करताना दिसणार आहे. शुजीत सरकार यांना क्रांतिकारी उधम सिंग यांच्या आयुष्यावर ...
रणबीर कपूर दिसणार क्रांतिकारकाच्या भूमिकेत ?
शुजीत सरकार आणि रणबीर कपूर लवकरच एकत्र काम करताना दिसणार आहे. शुजीत सरकार यांना क्रांतिकारी उधम सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार करायचा आहे. याचित्रपटात शुजीत यांना रणबीर कपूरला एका स्वांतत्र्य सैनिकाच्या भूमिकेसाठी साईन करण्यास उत्सुक असल्याचे समजते आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुजीत यांचे या चित्रपटासंदर्भात रणबीरशी बोलणे झाले आहे. रणबीरचे म्हणणे आहे जो पर्यंत संजय दत्तच्या बायोपिकचे शूटिंग पूर्ण नाही होत तो पर्यंत तो शुजीत यांना चित्रपटाबाबत मंजूरी नाही देऊ शकत. रणबीरचे यावर्षी दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. कॅटरिना कैफसोबतचा जग्गा जासूस आणि संजय दत्तच्या बायोपिक. या दोन्ही चित्रपटात रणबीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. रणबीर सध्या संजय दत्तच्या बायोपिकमध्ये संजय दत्तची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी तो प्रचंड मेहनत करताना दिसतोय. या बायोपिकमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे दिसणार आहेत. प्रत्येक टप्प्यावर संजयचे लूक बदलले आहे. अगदी त्याचप्रमाणे चित्रपटातील रणबीरचे लूकही बदलणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर एक नाही, दोन नाही तर एकूण सहा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसेल.शुजीत सरकार यांनी नुकतेच पीकू चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शुजीत नेहमीच वेगळ्या थटणीतले चित्रपट तयार करतात. सध्या शुजीत एका डार्क थ्रिलर चित्रपटाबाबत वरुम धवनशी बोलता आहेत. कदाचित उधम सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाच्या आधी शुजीत सरकार वरुण धवनच्या बरोबर चित्रपटाचे शूटिंग सुरु करतील. सुजीत सरकार यांचे म्हणणे आहे उधम सिंग यांच्या बायोपिक पटलावर पुढच्या वर्षी येईल.