Join us

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर, जानेवारीपासून करणार शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 14:00 IST

Ranbir Kapoor and Shraddha Kapoor will be seen together: रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरचे चाहते त्यांना एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

लव रंजन दिग्दर्शित रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपट १८ मार्च २०२२ला होळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली आहे.

लव फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिले की, कॅलेंडरवरील तारखेला खूण करून ठवा. लव रंजनाचा आगामी चित्रपट रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत सिनेमा २०२२च्या होळीच्या मुहूर्ताला म्हणजेच १८ मार्चला भेटीला येणार आहे.लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित, गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर दिसणार आहेत.

लव रंजनच्या या आगामी चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटातून रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर त्यांचे चाहते या नव्या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक लव रंजन प्यार का पंचनामा सीरिज, सोनू के टीटू की स्वीटी यांसारख्या सिनेमांसाठी ओळखला जातो. तो पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसोबत काम करतो आहे.

टॅग्स :श्रद्धा कपूररणबीर कपूर