Join us

जग्गा जासूसनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार रणबीर कपूर आणि अनुराग बासू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 17:31 IST

जग्गा जासूस बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यावर ऋषी कपूरने यासाठी दिग्दर्शक अनुराग बासूला जबाबदार ठरवले होते. ऋषी कपूरने अनुरागच्या कामा ...

जग्गा जासूस बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्यावर ऋषी कपूरने यासाठी दिग्दर्शक अनुराग बासूला जबाबदार ठरवले होते. ऋषी कपूरने अनुरागच्या कामा करण्याची पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. जग्गा जासूसच्या अपयशाला आपला मुलगा रणबीर नाही तर अनुराग बासू जबाबदार असल्याचे तो म्हणाला होता. ऋषी कपूरचे हे म्हणणे रणबीरला चांगलेच खटकले होते. जग्गा जासूस फ्लॉप झाला तरी याचा असर रणबीरला आपल्या मैत्रीवर पडून द्यायचा नव्हता. रणबीरला अनुरागच्या टेलेंटवर पूर्ण विश्वास आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार असे कळतेय की, रणबीर आता अनुराग सोबत पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट घेऊन येतोय. रणबीरच्या एका मित्राने सांगितले आहे की, ''रणबीर आणि अनुराग खूपच जवळचे मित्र आहेत. भलेही रणबीरला अनुरागच्या कामाची पद्धत आवडत नसेल पण या गोष्टीमुळे त्याच्या मैत्रीवर कोणताच परिणाम झालेला नाही. रणबीरने इंडस्ट्रीत आपल्या अनेक मित्रांसोबत फ्लॉप चित्रपट दिल्यामुळे काम करणे बंद केले आहे. मात्र त्याला अनुरागच्या गुणवत्तेवर पूर्ण विश्वास आहे. रणबीर आणि अनुराग मिळून लवकरच गायक किशोर कुमार यांच्या बायोपिक तयार करत आहेत. हा चित्रपट खूप दिवसांपासून अटकला होता कारण किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमारला याचित्रपटाचा कॉन्टेंट आपल्या नियंत्रणात ठेवायचा आहे.त्यामुळे रणबीर आणि अनुराग हा चित्रपट काल्पनिक आहे असे सांगून रिलीज करणार आहेत.''ALSO READ : अनुराग बासूवर का बरसले ऋषी कपूर?...वाचा सविस्तर जग्गा जासूमध्ये रणबीर आणि कॅटरिना कैफची मुख्य भमिका होती. हा चित्रपटाकडून रणबीरला खूप अपेक्षा होत्या. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. यानंतर संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर दिसणार आहे.