Join us

रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:18 IST

तीन वर्षांची झाली चिमुकली राहा, बर्थडे पार्टीची झलक समोर

रणबीर कपूर आणि आलिया भट यांची क्युट लेक राहा कपूरचा काल ६ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. छोटी राहा ३ वर्षांची झाली आहे. कपूर कुटुंबाने राहाचा वाढदिवसाचं खास सेलीब्रेशन केलं होतं. याची झलक आता सोशल मीडियावर समोर आली आहे. राहाची आजी नीतू कपूर यांनी काही फोटो शेअर केले आहेत. संपूर्ण कपूर कुटुंब आणि सिनेइंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटीही दिसत आहेत. 

राहा कपूरच्या बर्थडे पार्टीचे इनसाईड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर झलक दाखवली आहे. Raha's Fam Jam असं त्यांनी कॅप्शन दिलं आहे. आजी, मावशी असे सगळे राहाच्या वाढदिवसासाठी आले आहेत. रीमा जैन, सोनी राजदान, शाहीन भट यांची फोटोंमध्ये झलक दिसत आहे. तर एका फोटोत अभिनेत्री राणी मुखर्जीही आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच राहाच्या पार्टी धमाल केलेली दिसत आहे. 

तसंच राहाच्या बर्थडे पार्टीतून एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यामध्ये लहान मुलांसाठी पेपा पिग पपेट शो ठेवण्यात आला आहे. सेलिब्रिंटीची छोटी मुलं शो एन्जॉय करत आहेत. नमस्ते बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ आहे.

आलिया भटने  ६ नोव्हेंबर २०२२ साली राहाला जन्म दिला. आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती. एप्रिल २०२२ मध्ये तिने रणबीर कपूरशी लग्न केलं होतं. राहाच्या जन्मानंतर सगळीकडे तिचीच चर्चा होती. ख्रिसमसच्या दिवशी रणबीर आणि आलियाने पहिल्यांदा राहाला कॅमेऱ्यासमोर आणलं होतं. तिच्या क्युटनेसवर सगळेच फिदा झाले होते.  

English
हिंदी सारांश
Web Title : Ranbir-Alia celebrate Raha's birthday with fanfare; inside videos go viral.

Web Summary : Ranbir Kapoor and Alia Bhatt's daughter, Raha, turned three. The Kapoor family celebrated with family and Bollywood celebrities. Inside photos and videos from the Peppa Pig-themed party are circulating online. Raha was born in November 2022 and revealed to the public last Christmas.
टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटनितू सिंग