Join us

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : लग्न होताच रणबीरनं आलियाला केलं Kiss, सामोर आला पहिला Photo

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:59 IST

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होते. आपण यापूर्वीही या दोघांना एकत्रित पाहिले असेल. पण, हे दोघे आज अधिकच क्यूट दिसत होते. 

बॉलिवूड दिवा आलिया भट्ट (Alia Bhatt) आता मिसेस रणबीर कपूर झाली आहे. आलिया आणि रणबीरने (Ranbir Kapoor) कुटुंबीयांच्या उपस्थितीत 14 एप्रिलला, 'वास्तू'मध्ये सात फेरे घेत आयुष्यभर सोबत राहण्याची शपथ घेतली. आता हे दोघे पती-पत्नी बनले आहेत. चाहते आणि सेलिब्रिटी रणबीर आणि आलिया यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. यातच आता या क्यूट कपलचा पहिला फोटोही समोर आला आहे.

लग्नाच्या पेहरावात सुंदर दिसत होते रणबीर-आलिया -रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होते. आपण यापूर्वीही या दोघांना एकत्रित पाहिले असेल. पण, हे दोघे आज अधिकच क्यूट दिसत होते. 

आलियानं लग्नानंतरच्या आपल्या पहिल्या पोस्टमध्ये काय लिहिलं? -आलियाने रणबीर कपूर सोबतचे लग्नाचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आलियाने पोस्टमध्ये लिहिले, आज आपली फॅमिली आणि मित्रांच्या साक्षीने घरीच आमच्या फेव्हरिट स्पॉटवर - ती बालकनी जेथे आमच्या रिलेशनशिपची 5 वर्षे गेली - आज आमचे लग्न झाले. अनेक गोष्टी मागे सोडत, आम्ही एकत्रितपणे आणखी आठवणी बनविण्याची वाट पाहू शकत नाही. आठवणी ज्या आनंद, प्रेम, मूव्ही नाईट्स, सिली फाईट्स, वाईन डिलाइट्स,  चायनीज बाइट्सने भरलेल्या आहेत. याशिवाय, आलियाने तिच्या पोस्टमध्ये चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत.

रणबीर-आलियाचे लग्नाचे फोटोज -आलियाने या पोस्टसोबत तिच्या लग्नाचे काही फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोत रणबीर कपूर आलियाला किस करताना दिसत आहे. याशिवाय या फोटोंचा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्येही हा फोटो दिसत आहे. आलियाने पेस्टल कलरचा लेहेंगा परिधान केला आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटलग्न